22 November 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

IDFC First Bank Share Price | होय! बँक FD नव्हे, हा 61 रुपयांचा बँकिंग शेअर तुम्हाला 100% परतावा देईल, स्टॉक डिटेल्स पहा

IDFC First Bank Share Price

IDFC First Bank Share Price | 2022 या वर्षात अनेक बँकिंग सेक्टरमधील कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आणि सर्वांच्या नजरा 2023 या वर्षावर टिकुन आहेत. गुंतवणूकदार नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधत आहेत. याबाबत तज्ञांना विश्वास आहे की, IDFC फर्स्ट बँकचा शेअर 2023 मध्ये जबरदस्त परतावा देऊ शकतो. व्याज दरवाढीमुळे आणि कॉर्पोरेट कर्ज व्यवसायात झालेल्या अपेक्षित वाढीमुळे शेअर बाजारातील तज्ञांना IDFC फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. या स्टॉकने 2022 या वर्षाच्या शेवटच्या 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले. शेअर बाजारातील तज्ञांना वाटते की, IDFC फर्स्ट बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड व्यवसाय वृढीवर आणि ऑनलाइन कर्ज उपलब्ध करून देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे खाजगी बँकिंग क्षेत्रात तिची ‘नेक्स्ट जनरेशन बँक’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDFC First Bank Share Price | IDFC First Bank Stock Price | BSE 539437 | NSE IDFCFIRSTB)

शेअरची वाटचाल :
स्टॉक मार्केट तज्ञ म्हणतात की, IDFC फर्स्ट बँकेच्या शेअर्सने 45 रुपये या किंमत पातळीवर ब्रेकआउट दर्शवला आहे. हा स्टॉक सध्या 45 ते 60 रुपये किंमत श्रेणीत ट्रेड करत आहे. जर या स्टॉकने 60 रुपयेची किंमत पातळी तोडली की, तो 70 रुपये किमतीपर्यंत जाऊ शकतो. या स्टॉकने आपल्या डेली चार्टवर ‘हायर हाय – हायर लो’ पॅटर्न तयार दर्शवला आहे. जर हा चार्ट पॅटर्न टिकुन राहिला तर तो पुढील काळात 70 रुपयेच्या वर जाऊ शकतो. ‘हायर हाय-हायर लो’ पॅटर्न स्टॉकमधे अधिक तेजीचा संकेत देतो. शेअर बाजार तज्ञांना विश्वास आहे की, जर IDFC बँकचे शेअर्स 70 रुपयेच्या वर टिकून राहण्यास यशस्वी ठरले तर हा बँकिंग स्टॉक 2023 मध्ये 3 अंकी आकडा सहज स्पर्श करेल. काही तज्ञ म्हणतात की IDFC फर्स्ट बँकेचे शेअर 120 रुपये किंमत पातळीवर पोहोचू शकतात. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 4.00 टक्के वाढीसह 61.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीज फर्म अहवाल
आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्समधील रॅलीचा वेध घेऊन एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात तनी म्हंटले आहे की, “इतर भारतीय बँकेप्रमाणेच, कडक व्याजदर प्रणालीमुळे, आयडीएफसी बँकेच्या रिटेल होल्डिंगमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बँक पुढील काळात चांगला नफा कमवू शकते. आणि याव्यतिरिक्त, त्यात कॉर्पोरेट फंडिंगचे एक्सपोजर पाहायला मिळत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेला रिटेल बँकिंग आणि कॉर्पोरेट बँकिंग या दोन्ही क्षेत्रात फायदा होऊ शकतो. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये बँकेच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये कमालीची सुधारणा होईल, बँकेला अशी अपेक्षा आहे.

2022 या वर्षात प्रवेश केल्यानंतर IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स जुलै 2022 पर्यंत जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली होते. तथापि, जुलै 2022 च्या शेवटच्या आठवड्यापासून सर्व बँकिंग स्टॉकमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. जुलै पासून बँकिंग शेअर्स तेजीत आले होते, आणि ही तेजी अजूनही कायम आहे. मागील सहा महिन्यांत IDFC फर्स्ट बँकेच्या शेअरची किंमत 31.50 रुपयेवरून वाढून 60 रुपये पर्यंत गेली आहे. या दरम्यान पैसे लावणाऱ्या लोकांनी 85 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. तथापि, स्टॉकचे मूल्य अजूनही कमी आहे, कारण त्याने YTD आधारावर फक्त 20 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDFC First Bank Share Price 539437 IDFCFIRSTB in focus over returns check details on 02 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x