22 November 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Investment Scheme | पैसे दुप्पट करणारी सामान्य लोकांची आवडती सरकारी योजना, आता व्याजाचे दर वाढल्याने अधिक फायदा

Investment Scheme

Investment Scheme | इंडिया पोस्ट ऑफीसच्या लोकप्रिय योजनांपैकी एक ‘किसान विकास पत्र’ सध्या चर्चेत आहे. कारण नुकताच भारत सरकारने या योजनेच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच केंद्र सरकारने NSC आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांसारख्या गुंतवणूक योजनांचे व्याजदरही वाढवले आहे. इंडिया पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांमध्ये तूम्ही उत्कृष्ट परतावा कमवू शकता, आणि ही योजना आपल्या गुंतवणुकदारांना ठेव रकमेच्या सुरक्षिततेची हमी देखील देते. या कारणास्तव, लोक पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनावर अधिक विश्वास ठेवतात. किसान विकास पत्रामध्ये किमान 1000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेचा परिपक्वता कमावधी 123 महिने आहे. चला तर मग जाणून घेऊ या योजनेची सविस्तर माहिती.

2023 मधील नवीन व्याजदर :
KVP योजनेचे नवीन व्याजदर 30 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आले. सध्या सरकारने KVP योजनेसाठी 7.2 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. भारत सरकार दर तीन महिन्यांनी किसान विकास पत्र योजनेच्या व्याजदराने पुनर्विलोकन करून त्यात सुधारणा करत असते. KVP योजनेच्या व्याज दराचे पुनर्विलोकन मार्च 2023 च्या अखेरीस केले जाईल.

गुंतवणुकीवर हमी परतावा :
इंडिया पोस्ट ऑफिसद्वारे KVP योजना राबवली जाते. ही योजना आपल्या गुंतवणूकदारांना हमी परतावा देते. या जी रक्कम तुम्ही गुंतवणूक कराल ती पूर्णपणे सुरक्षित राहील.

120 महिन्यांत पैसे दुप्पट :
KVP गुंतवणूक योजनेतील रक्कम 7.2 टक्के या नवीन व्याजदराने 10 वर्षात दुप्पट होईल.

गुंतवणुक मर्यादा :
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. गुंतवणूकदार 1000 रुपये, 5000 रु, 10000 रुपये, आणि 50000 रुपयेचे प्रमाणपत्र खरेदी करून यात गुंतवणूक करू शकतात. KVP योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही.

अल्पवयीनांसाठी खाते :
KVP योजनेत 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलांच्या नावाने ही गुंतवणूक करता येते. पालक आपल्या मुलांच्या नावाने या योजनेत पैसे जमा करू शकता.

मुदत पूर्व खाते बंद करणे :
KVP योजना खाते गुंतवणूक सुरू केल्यावर 2 वर्षे 6 महिन्यांनंतर ते बंद करता येते. या योजनेत मुदत पूर्व गुंतवणूक बंद करण्याचा कालावधी 2 वर्ष 6 महिने म्हणजे अडीच वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

KVP गुंतवणूकसाठी आवश्यक कागदपत्रे :
या योजनेत काही डॉक्युमेंटची पूर्तता करणे आवश्यक आहे. KYC साठी आयडी कार्ड ज्यामध्ये आधार कार्ड/पॅन/मतदार आयडी/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट हे तुम्ही देऊ शकता, पत्त्याचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र देऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post office Kisan Vikas Patra Investment Scheme check details on 2 January 2023.

हॅशटॅग्स

#Investment Scheme(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x