22 November 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Paytm Share Price | काय सांगता? पेटीएम शेअर 74% पेक्षा जास्त घसरून स्वस्त झालाय, पुढे नफा की तोटा? नेमकं काय करावं?

Paytm Share Price

Paytm Share Price | IPO मध्ये पैसे लावताना गुंतवणूकदारांचा त्यातून जास्तीत जास्त नफा कमाव्याचा हेतू असतो. एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावून त्यातून अल्पावधीत किंवा दीर्घकाळात बंपर परतावा मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांच्या IPO ला 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे, परंतु त्याचे शेअर्स अजूनही पडत आहेत. अशा कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना नुकसानीला सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार पेटीएम कंपीनीच्या शेअरबाबत घडला आहे. 2022 मध्ये पेटीएम कंपनी शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे खूप नुकसान केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएम कंपनीच्या IPO अतिशय उच्च मूल्यावर लॉन्च करण्यात आला होता. पेटीएम कंपनीने गुंतवणूकदारांना IPO लाँच करताना स्टॉक पुढील काळात आयपीओ किमतीच्या वर जाईल असा विश्वास देवून IPO शेअर्स बाजारात जारी केले होते. मात्र झाले उलट पेटीएमच्या स्टॉकमध्ये जबरदस्त पडझड झाली. आणि आता परिस्थिती अशी आहे की, पेटीएम कंपनीचा स्टॉक प्रचंड विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे.

पेटीएम शेअरची किंमत :
2022 या वर्षात पेटीएम कंपनीचे शेअर्स कमालीचे पडले होते. शेअरची किंमत मोठ्या प्रमाणत घसरली होती. पेटीएम कंपनीचा स्टॉक 2022 मध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त पडला होता. NSE इंडेक्सवर पेटीएम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1350 रुपये होती. तर पेटीएम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 438.35 रुपये होती. 31 डिसेंबर 2021 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1334.55 रुपये किमतीवर पोहचले होते. तर सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 529.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान :
2022 या वर्षात पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये 803.85 रुपयांची घसरण होऊन शेअर 529.30 रुपये किमतीवर आले आहेत. म्हणजेच या स्टॉकमध्ये सुमारे 60.23 टक्के घसरण झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये Paytm कंपनीचा IPO 2150 रुपये किमतीसाठी लाँच करण्यात आला होता, आणि त्याची लिस्टिंग 1950 रुपयेवर झाली होती. 18 नोव्हेंबर 2021 रोजी, Paytm स्टॉक घसरणीसह सूचीबद्ध झाला होता, आणि शेअर लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक 1564 रुपये किमतीवर बंद झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 in focus check details on 02 January 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x