19 April 2025 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Yes Bank Share Price | स्वस्त झालेल्या येस बँकेच्या शेअरने 1 महिन्यात 25% परतावा दिला, आजही वाढ, रिटर्नच्या अपेक्षा का वाढल्या?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | शेअर बाजाराच्या दृष्टीने 2023 या नवीन वर्षाची जबरदस्त सुरुवात झाली आहे. स्टॉक मार्केट हिरव्या निशाणीवर व्यापार करत आहे. बाजारात किंचित तेजी आली असून अनेक स्टॉक आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. असाच एक बँकिंग शेअर आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. एक काळ असा होता जेव्हा, बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे संपूर्ण भांडवल बुडवले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हा स्टॉक तेजीत आला असून जे गुंतवणुकदार यात मोठ्या किमतीवर अडकले होते, त्यांना आशेचा एक नवीन किरण दिसत आहे. हा शेअर 50 रुपयांची उंची गाठेल असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

1 महिन्यातच 25 टक्क्यांहून अधिक परतावा :
आज या लेखात आपण येस बँक कंपनीच्या स्टॉक वडसल माहिती जाणून घेणार आहोत. येस बँकेचे शेअर्स मागील बऱ्याच महिन्यापासून तेजीत व्यवहार करत आहेत. मागील 1 महिन्यातच या बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 25 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 5 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स एनएसई इंडेक्सवर 17.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर शेअरमध्ये खरेदी वाढू लागली, आणि शेअर तेजीत सुसाट धावत निघाला. डिसेंबर 2022 मध्ये येस बँक शेअरने 24.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

शेअरची कामगिरी :
येस बँक शेअरची मागील 6 महिन्यांची कामगिरी पाहिली तर आपल्याला समजेल की, गेल्या 6 महिन्यांत या बँकिंग स्टॉकने लोकांना उत्कृष्ट परतावा मिळवून दिला आहे. 4 जुलै 2022 रोजी येस बँकेचे शेअर 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तथापि आता 2 जानेवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 21.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी येस बँक शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 72 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे.

येस बँक शेअरची वाटचाल :
मागील काही आठवड्यांत येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. या शेअर्समधील खरेदी विक्री प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. त्याचबरोबर शेअर बाजार तज्ञ देखील येस बँक शेअर्स बाबत सकारात्मक असून त्यांना शेअर मध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, आरएसआय स्मूथ इंडिकेटरमध्ये येस बँक शेअरमध्ये फ्रेश खरेदीचे संकेत मिळत आहेत. आणि स्टॉक पुढील काळात वाढेल यात कोणतीही शंका नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price 532648 YESBANK in focus check details on 03 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या