25 April 2025 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा Horoscope Today | 25 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रावरचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रावरचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

Gold Price Today | सोन्याचे दर सुसाट! आजही दर वाढले, रेकॉर्ड दर ओलांडणार? आजचे नवे दर तपासा

Gold Price Today

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नव्या वर्षात दोन्ही मौल्यवान धातूंची झपाट्याने वाढ झाली आहे. भारतीय वायदे बाजारात आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. बुधवार ४ जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव आज ०.३६ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीच्या दरात आज ०.२९ टक्के वाढ झाली आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.67 टक्क्यांनी वधारुन बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा दर 0.50 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. सोन्याचा भाव सध्या ३० महिन्यांच्या उच्चांकावर असून लवकरच त्याची विक्रमी किंमत गाठता येईल.

24 कॅरेट सोन्याचा भाव – Gold Price Today
बुधवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,728 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत रात्री 9:25 पर्यंत 198 रुपयांनी वधारला होता. आज सोन्याचा भाव ५५,६२० रुपयांवर खुला होता. याआधीच्या व्यापारी सत्रात हा मौल्यवान धातू ३६८ रुपयांनी वधारून एमसीएक्सवर ५५,४७० रुपयांवर बंद झाला होता.

चांदीही चमकली
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवरही (Gold & Silver Price on MCX) चांदीमध्ये आज वाढ होताना दिसत आहे. चांदीचा दर आज 203 रुपयांनी वाढून 70,120 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदी आज 70,076 रुपयांवर उघडली आहे. एकदा हा भाव ७०,२०० रुपयांपर्यंत गेला. पण, काही वेळाने ती ७०,१२० रुपये झाली. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर चांदीचा भाव 349 रुपयांनी वाढून 69,920 रुपयांवर बंद झाला होता.

सराफा बाजारात भाववाढ
दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३८,४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 55,434 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही काल १,३७४ रुपयांनी वधारून ७१,२२४ रुपये प्रति किलोवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदीची वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीचे भाव तेजीत आहेत. सोन्याचा स्पॉटचा भाव आज 0.90 टक्क्यांनी वाढून 1,845.64 डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीही हिरव्या निशाण्यावर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today update check derails on 04 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या