19 April 2025 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

BF Investment Share Price | होय! 7 दिवसात शेअरने 60% परतावा दिला, कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, स्टॉक वाढीचे कारण?

BF Investment Share Price

BF Investment Share Price | बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कल्याणी उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मात्र बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी BF इन्व्हेस्टमेंट कंपनीचा स्टॉक 3 टक्के घसरणीसह 408 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीने संचालक मंडळाची बैठक जाहीर केली असून याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर पहायला मिळत आहे. BF इन्व्हेस्टमेंट कंपनीने 4 जानेवारी 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत संचालक मंडळाचे सदस्य शेअर्स डिलिस्टिंगच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. बीएफ इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने 30 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंज नियमन सेबीला स्वैच्छिक डिलिस्टिंग करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BF Investment Share Price | BF Investment Stock Price | BSE 533303 | NSE BFINVEST)

शेअर्समध्ये जबरदस्त उसळी :
बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 7 ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वधारले आहेत. मागील 7 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 61 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड Ltd. कंपनीचे शेअर्स BSE एक्सचेंजवर 261.85 रुपये किमतीवर व्यापार करत होते. 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 420.10 रुपये किमतीवर पोहचले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 235.75 रुपये होती.

बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही कंपनी कल्याणी उद्योग समूहाचा एक भाग म्हणून ओळखली जाते. BF इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीने BSE नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, अजिंक्य इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी, DGM रियल्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि सुंदरम ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आपल्या किरकोळ शेअर धारकांकडून वैयक्तिक किंवा एकत्रितपणे सर्व इक्विटी शेअर्स अधिग्रहण करणार आहे. या तिन्ही कंपन्या प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुप ऑफ कंपनीजचे सदस्य आहेत. पुणे स्थित बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही 2.5 कोटी डॉलर्स मार्केट कॅप असलेल्या कल्याणी उद्योग समूहाची शाखा आहे. बीएफ युटिलिटीज कंपनीची गुंतवणुक शाखा असलेल्या BF Investment कंपनीचा व्यवसाय डीमर्ज करून या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

5 दिवसात 50 टक्के वाढ :
BF इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसात 50.57 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 28 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 279 रुपये या किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 3 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे या कंपनीचे शेअर्स 420.10 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीमध्ये प्रवर्तकांची गुंतवणूक हिस्सेदारी 74.13 टक्के आहे. तर या कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी 25.87 टक्के आहे. BF Investments कंपनीचे बाजार भांडवल 1582 कोटी नोंदवण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BF Investment Share Price 533303 BFINVEST check details on 04 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या