23 November 2024 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

South Indian Bank Share Price | बँक FD नव्हे, या बँकेचा फक्त 20 रुपयांचा शेअर श्रीमंत करतोय, 300% परतावा दिला, खरेदी करणार?

South Indian Bank Share Price

South Indian Bank Share Price | सध्या शेअर बाजारात बँकिंग सेक्टर मधील कंपन्यांचा बोलबाला आहे. बँकिंग सेक्टर जबरदस्त कामगिरी करत आहे. जर तुम्ही बँकिंग शेअर्समध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही साऊथ इंडियन बँकच्या शेअरवर लक्ष ठेवू शकतात. कारण अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने 20 जून 2022 रोजी 7.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत गाठली होती. मागील महिन्यात 15 डिसेंबर 2022 हा स्टॉक 21.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. 2022 मध्ये सप्टेंबर तिमाहीत उत्तम कामगिरी केल्यानंतर या स्टॉकमध्ये तेजी कायम आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी 2.70 टक्के घसरणीसह 19.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, South Indian Bank Share Price | South Indian Bank Stock Price | BSE 532218 | NSE SOUTHBANK)

2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत साऊथ इंडियन बँकने 223.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने एका निवेदनात माहिती दिली आहे की, बुडीत कर्जावरील तरतुदींमध्ये कपात केल्यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्य जुलै-सप्टेंबर तिमाहीत बँकेला 187.06 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

जून 2022 पासून स्टॉक तेजीत : 6 महिन्यांत 300% परतावा
जून 2022 मध्ये 7 रुपये किंमत पातळी स्पर्श केल्यानंतर डिसेंबर 2022 पर्यंत हा स्टॉक 21 रुपयांवर गेला होता. अवघ्या 6 महिन्यांच्या साऊथ इंडियन बँक शेअरने आपल्या शेअर धारकांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 जानेवारी 2023 रोजी 2.70 टक्के घसरणीसह 19.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. साऊथ इंडियन बँकचे सीएमडी आणि सीईओ मुरली रामकृष्णन यांनी बँकेच्या ग्रॉस एनपीए आणि कर्ज पुस्तकाबाबत माहिती दिली आहे की, मार्च 2023 पर्यंत बँक आपल्या सकल नॉन-परफॉर्मिंग अॅसेट कर्जाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करेल. सकल नॉन-परफॉर्मिंग अॅसेट 5.8 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर येण्याचा अंदाज रामकृष्णन यांनी व्यक्त केला आहे.

मागील तिमाहीत साऊथ इंडियन बँकच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. या बँकेचा NPA प्रमाण 30 सप्टेंबर 2022 पर्यंत एकूण कर्जाच्या 5.67 टक्के होता. सप्टेंबर 2021 अखेर बँकेचा NPA 6.65 टक्के होता. मूल्याच्या बाबतीत विचार केला तर आपल्या समजेल की, साऊथ इंडियन बँक बँकेचा NPA या कालावधीत 3,879.60 कोटी रुपयांवरून 3,856.13 कोटी रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण म्हणजेच बुडीत कर्जाचे प्रमाण 3.85 टक्केवरून वरून 2.51 टक्के पर्यंत घटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | South Indian Bank Share Price 532218 SOUTHBANK in focus check details on 04 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x