23 November 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

TTML Share Price | 60% स्वस्त झालेला टाटा ग्रुपचा हा शेअर 87 रुपयांवर ट्रेड करतोय, खरेदीची योग्य वेळ की अजून वाट पाहावी?

TTML Share Price

TTML Share Price | भारतातील सर्वात मोठा आणि दिग्गज उद्योग समूह म्हणजेच टाटा उद्योग समूह याचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीचे शेअर्स 290.15 रुपयांवरून 90 रुपयांपर्यंत पडले आहेत. मागील 5 वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1245 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या शेअर धारकांना कंगाल बनवले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, TTML. शुक्रवारी सकाळी (०६ जानेवारी २०२३) हा शेअर 1.91% वाढून 87.20 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

2022 च्या सुरुवातीला TTML कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावणारे गुंतवणूकदार कंगाल झाले आहेत. या वर्षी TTML कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांचा 60 टक्के तोटा केला आहे. म्हणजेच जर तुम्ही 3 जानेवारी 2022 रोजी TTML कंपनीच्या शेअरमध्ये 216.65 रुपये प्रति शेअर या किमतीवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 40,000 राहिले असते. 11 जानेवारी 2022 रोजी TTML ने 290.15 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत शेअर्स केली होती. यानंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव प्रचंड प्रमाणात वाढला, आणि 23 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 82.95 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर आली. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी 0.14 टक्के घसरणीसह 89.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

TTML कंपनीबद्दल थोडक्यात :
टाटा उद्योग समूहाचा भाग असलेली TTML ही कंपनी Tata Teleservices ची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या क्षेत्रात मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. TTML कंपनी मुख्यतः व्हॉईस आणि डेटा सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक दिग्गज कंपन्यांचे नाव सामील आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते मागील महिन्यात TTML कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा लाँच केली आहे.

क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेट
TTML कंपनीच्या ग्राहकांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण मिळत असल्याने याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्लाउड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जेणेकरून डेटा सुरक्षित ठेवता येईल. भाडेतत्त्वावर डिजिटल आधारावर चालू असलेल्या लहान मोठे व्यवसायांना याचा फायदा होणार आहे. TTML कंपनी आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अंगभूत सुरक्षा व्यवस्था प्रदान करते, आणि सोबत वेगवान इंटरनेट सुविधाही देते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 in focus check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x