22 November 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Hemang Resources Share Price | जॅकपॉट पेनी शेअर! 1 वर्षात 1 लाखाचे 20 लाख केले, आज 5% वाढला, खरेदी करणार

Hemang Resources Share Price

Hemang Resources Share Price | मागील एका वर्षभरात जगातील सर्व शेअर बाजारात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार अस्थिर असतानाही अनेक कंपन्याच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये अनेक पेनी स्टॉक्स कंपन्याही आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती केले आहे. हेमांग रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरने 2022 मध्ये लोकांना मालामाल केले आहे. या स्टॉकने आपल्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या एका वर्षात 3.25 रुपयांवरून वाढून 66 रुपयेवर पोहोचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)

2022 मध्ये हेमांग रिसोर्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1900 टक्के परतावा कमावून दिला आहे. पेनी स्टॉकमध्ये पैसे लावणे फार धोकादायक असते, कारण त्यात तरलता खूप कमी असते, आणि हे शेअर्स स्टॉक मार्केटच्या प्रवाहाविरुद्ध ही ट्रेड करतात. तथापि उच्च जोखम घेणारे ट्रेडर्स पेनी स्टॉकमध्ये पैसे लावतात. त्यांना कंपनीचे व्यवसाय मॉडेल आणि आर्थिक आरोग्याबद्दल खात्री पटली की ते पैसे लावून दीर्घकाळ स्टॉक होल्ड करतात.

हेमांग रिसोर्सेस लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक BSE निर्देशांकात सूचीबद्ध आहे. हा स्टॉक एकेकाळी 3.25 रुपये प्रति इक्विटी शेअर या किमतीवर ट्रेड करत होता. तो सध्या शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी 4.98 टक्के वाढीसह 68.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. म्हणून या स्टॉक मध्ये पैसे लावणाऱ्या स्थितीगत गुंतवणूकदारांना जवळपास 1900 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. मागील एका आठवड्यात या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकमध्ये दोन वेळा अप्पर सर्किट लागला होता. आणि लोकांना फक्त दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 5.50 टक्क्यांहून अधिक म्हणजेच एफडी पेक्षा अधिक परतावा मिळाला होता.

हेमांग रिसोर्सेस शेअर किंमतीचा इतिहास :
मागील एका महिन्यात या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची किंमत 56.50 रुपयेवरून 66 रुपये प्रति शेअर किंमत पातळीवर गेली आहे. मागील एका महिन्यात या शेअरची किंमत 15 टक्के वधरली आहे. तर गेल्या सहा महिन्यांत हा मल्टीबॅगर स्टॉक 45.20 रुपयेवरून 66 रुपये प्रति शेअर किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत शेअर धारकांनी 45 टक्के परतावा कमावला आहे. त्याचप्रमाणे, गमागील एका वर्षात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 3.25 रुपये किमतीवरून 66 रुपये प्रति शेअर या किंमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना 1900 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे.

1 लाखावर मिळाला 20 लाख परतावा :
जर तुम्ही एक आठवड्यापूर्वी या स्मॉल-कॅप मल्टीबॅगर कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.05 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही एक महिनाभरापूर्वी 1 लाख गुंतवले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.15 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमची गुंतवणूक वाढून 1.45 लाख रुपये झाली असती. एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख लावले होते, त्यांना तर आता जॅकपॉटला लागला असता. अवघ्या एका वर्षात या स्टॉकने 1 लाख रुपयेवर 20 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्स ट्रेड करत आहेत सध्या स्टॉक 17,549 च्या ट्रेडिंग व्हॉल्यूमसह ट्रेड करत होता. तर मागील 20 दिवसांची सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूम 34,284 होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hemang Resources Share Price 531178 in focus check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x