15 November 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

Lords Chloro Alkali Share Price | या शेअरने 1 वर्षात 226% परतावा तर 2 वर्षात 600% परतावा, पुढे या स्टॉकबद्दल तज्ञ काय सांगतात?

Lords Chloro Alkali Share Price

Lords Chloro Alkali Share Price | रेयॉन ग्रेड कॉस्टिक सोडा आणि कॉस्टिक कॉन्सन्ट्रेशन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘लॉर्ड्स क्लोरो अल्कली लिमिटेड’ सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर भारतात स्थित असलेली ही कंपनी आपल्या अनेक ग्राहक कंपन्यांना आपले उत्पादन पुरवते. कंपनी मुख्यतः पेपर, सोडा, डाई, रसायने आणि प्लास्टिक उद्योगांवर आधारित वस्तूंचा पुरवठा आपल्या ग्राहक कंपन्यांना करते. हरियाणा, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात कंपनीचा ग्राहक वर्ग अधिक आहे. लॉर्ड्स क्लोरो अल्कली लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 जानेवारी 2021 रोजी 34.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल 6 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 215.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lords Chloro Alkali Share Price | Lords Chloro Alkali Stock Price | BSE 500284)

कंपनीच्या महसुलात वाढ :
लॉर्ड्स क्लोरो अल्कली लि कंपनीचा स्टॉकने मागील 2 वर्षात आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत S&P BSE स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 55 टक्के वाढ झाली होती. या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ महसुलात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे कंपनीचा महसूल 61.91 टक्के वाढून 76.47 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 590.57 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि कंपनीने 14.64 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

उच्चांक आणि नीचांक पातळी :
लॉर्ड्स क्लोरो अल्कली लिमिटेडचा शेअर 6 जानेवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर 214.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या दिवशी कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 219.60 रुपये होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 418.80 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 62.00 रुपये होती.

वार्षिक परतावा :
लॉर्ड्स क्लोरो अल्कली लिमिटेड या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 20.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअरची किंमत एका वर्षभरात 226.23 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 542.82 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lords Chloro Alkali Share Price 500284 in focus check details on 07 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x