23 November 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Zomato Share Price | झोमॅटो मॅनेजमेंटमध्ये राजीनामा सत्र सुरूच, शेअरवर काय परिणाम? स्टॉकची पुढे वाटचाल कशी असेल

Zomato Share price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर कंपनी झोमॅटो लिमिटेडच्या उच्च मॅनेजमेंटमध्ये अजूनही गडबड कायम आहे. याचा नकारात्मक परिणाम झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर होत आहे. 2023 हे नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवसच झाले आहे, आणि झोमॅटो कंपनीच्या स्टॉकमध्ये 9 टक्के पडझड झाली आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 57.10 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. अवघ्या एका वर्षात झोमॅटो कंपनी स्टॉक 129 रुपयांवरून 55.45 रुपयांपर्यंत पडला आहे. या कंपनीतील मोठया अधिकाऱ्याच्या राजीनामे देण्याचा सपाटा थांबत नाही आहे. या आठवड्यातही झोमॅटो कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ‘गुंजन पाटीदार’ यांनी राजीनामा देऊन कंपनीच्या मॅनेजमेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 56.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

झोमॅटो’मध्ये घसरण कायम, काय आहे कारण?
झोमॅटो कंपनी आपल्या स्टॉक मार्केट नियामक सेबी ला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ‘गुंजन पाटीदार’ हे कंपनीच्या खास कर्मचाऱ्यांपैकी एक होते ज्यानी कंपनीसाठी मुख्य तंत्रज्ञान प्रणाली निर्माण केली होती. झोमॅटो कंपनीने ‘गुंजन पाटीदार’ यांचे कंपनीच्या वाढीत मोठे योगदान आहे, असे म्हंटले आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण कंपनीने अजूनही सांगितले नाही. मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये झोमॅटो कंपनीचे को-फाउंडर ‘मोहित गुप्ता’ यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 2020 मध्ये झोमॅटो कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाच्या सीईओ पदावरून त्यांची सह- संस्थापक म्हणून पदोन्नती झाली होती. राहुल गंजू आणि सिद्धार्थ झंवर यांसारख्या कंपनीतील बड्या अधिकाऱ्यांनीही झोमॅटो कंपनीच्या व्यवस्थापनातून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मॅनेजमेंट मधून ते बाहेर पडले. मागील वर्षी झोमॅटोने आपल्या 3 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देऊन त्यांची रवानगी केली होती.

झोमॅटो कंपनी नफा आणि तोटा :
सप्टेंबर 2022 तिमाहीत झोमॅटो कंपनीला 250.8 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 434.9 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. याशिवाय झोमॅटो कंपनीच्या महसुलात 62.20 टक्क्यांची वाढ झाली असून 1,661.3 कोटी रुपयेवर गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा सेल्स रेव्हेन्यू 5,410 कोटी रुपये होता. जो सप्टेंबर तिमाहीत 22 टक्क्यांच्या वाढीसह 6,631 कोटी रुपयेवर गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 in focus check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x