22 November 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Nitin Spinners Share Price | करोडपती बनवणारा शेअर, 5597% परतावा, आता ICICI सिक्युरिटीजने दिली मोठी टार्गेट प्राईस, खरेदी करावा?

Nitin Spinners Share Price

Nitin Spinners Share Price | नितीन स्पिनर्स या टेक्सटाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनीने दीर्घ काळात आपल्या शेअर धारकांना अद्भूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर मध्ये 35 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे, मात्र गुंतवणूक तज्ञ आणि संस्था याकडे गुंतवणूकीची एक सुवर्ण संधी म्हणून पाहत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nitin Spinners Share Price | Nitin Spinners Stock Price | BSE 532698 | NSE NITINSPIN)

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज
भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘नितीन स्पिनर्स’ कंपनीच्या शेअरसाठी 290 रुपये ही नवीन लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 41 टक्के अधिक आहे. 6 जानेवारी 2023 रोजी ‘नितीन स्पिनर्स’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 205.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी ‘नितीन स्पिनर’ कंपनीचे शेअर्स 8.13 टक्के वाढीसह 221.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 1,153.07 कोटी रुपये आहे.

दीर्घकालीन परतावा :
6 मार्च 2009 रोजी नितीन स्पिनर्स कंपनीचे शेअर्स 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 221.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. म्हणजेच मागील 14 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 5597 टक्के परतावा कमावून मिळाला आहे. मागील वर्षी 8 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 345.75 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 6 मार्च 2009 रोजी नितीन स्पिनर्स कनोंज पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना आता 9504 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांक स्पर्श केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत 47 टक्के खाली आले आहे. 20 जून 2022 पर्यंत हा स्टॉक 182.10 रुपयांवर आला होता. नंतर शेअर मध्ये पुन्हा तेजी आली आणि शेअरमध्ये 13 टक्के सुधारणा झाली. मात्र अजूनही शेअरची किंमत आपल्या विक्रमी उच्चांक किमतीच्या तुलनेत 41 टक्के खाली ट्रेड करत आहे.

नितीन स्पिनर्सची पुढील वाटचाल :
नितीन स्पिनर्स कंपनी मुख्यतः धागा निर्माण करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. या कंपनीचा व्यवसाय भारतासोबत 50 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. कंपनी अनेक देशात आपले उत्पादन निर्यात करते. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते कापड उद्योगात कधी तेजी असते तर कधी मंदी असते. परंतु नितीन स्पिनर्स कंपनीचे शेअर्स सतत चांगली कामगिरी करत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या माहितीनुसार यार्न, फॅब्रिकममधील मजबूत गुणवत्तामुळे, जागतिक कापड बाजारात कंपनीला निर्यात संधींचा मोठा फायदा होऊ शकतो. भारत सरकारने इतर देशांशी मुक्त व्यापार करण्यावर भर दिला आहे, ज्याचा फायदा कंपनीला होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने 290 रुपये लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nitin Spinners Share Price 532698 NITINSPIN in focus check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Nitin Spinners Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x