25 November 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

HDFC Mutual Fund | अबब! मल्टीबॅगर शेअर नव्हे तर म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांच्या SIP वर 12 कोटी परतावा दिला, नोट करा

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | आज या लेखात आपण ‘HDFC फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड’ ने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा कमावून दिला आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या काही वर्षांत 10,000 च्या SIP गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना 12 कोटींचा बंपर परतावा मिळवून दिला आहे. HDFC फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड हा एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी फंड आहे, जो मुख्यतः लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावतो. हा म्युचुअल फंड प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये पैसे लावतो, आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ निर्माण करतो. हा फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड 1 जानेवारी 1995 रोजी लाँच करण्यात आला होता, आणि तेव्हापासून 2023 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेने आपली 28 वर्षे यशस्वीरित्या पार केले आहेत. (Flexi Cap Fund Flexi Cap Fund NAV)

वर्षानुवर्षे परतावा :
ही म्युच्युअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना मार्केट कॅपिटलायझेशन आणि अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता प्रदान करते. या म्युचुअल फंडाने सुरूवातीपासून आतापर्यंत 10,000 रुपयेच्या नियमित SIP वर 21 टक्के CAGR दराने 12 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे.

10,000 मासिक SIP वर परतावा :
मागील एका वर्षापूर्वी जर तुम्ही या योजनेत 10000 ची SIP गुंतवणूक सुरू केली असती तर, तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 1.20 लाख झाली असती. आणि त्यावर एका वर्षात तुम्हाला 1.39 लाख रुपये परतावा मिळाला असता. मागील एका वर्षात या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 30.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षासाठी या योजनेत 10000 ची SIP गुंतवणूक केली असती तर 3.60 लाख तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली असती आणि त्यावर तुम्हाला सरासरी वार्षिक 31.03 टक्के दराने 5.61 लाख रुपये परतावा मिळाला असता.

15 वर्षांत गुंतवणुकीवर परतावा :
मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंडाच्या SIP योजनेत पैसे लावणाऱ्या लोकांना सरासरी वार्षिक 20.82 टक्के परतावा मिळाला आहे. जर तुम्ही 5 वर्ष कालावधीसाठी यात 10,000 ची मासिक SIP गुंतवणूक केली असती तर 12 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20.82 टक्के दराने 27.92 लाख रुपये परतावा मिळाला असता. मागील 10 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने SIP गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 16.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्ष कालावधी साठी या योजनेत 10,000 ची SIP सुरू केली असती तर, 18 लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 63.38 लाख रुपये परतावा मिळाला असता.

मागील 15 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने लोकांना सरासरी वार्षिक 15.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्युचुअल फंडाच्या स्थापनेपासून जर तुम्ही 10000 ची एसआयपी गुंतवणूक केली असती असती तर, 21 टक्के CAGR दराने 33.50 लाख गुंतवणूकीवर तुम्हाला 12.94 कोटी रुपये परतावा मिळाला असता. 31 डिसेंबर 2022 पर्यंत, HDFC फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड योजनेची AUM 32,894 कोटी आहे. या योजनेच्या व्यवस्थापनाखाली सरासरी मासिक AUM 32,128 कोटी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Mutual Fund Flexicap Mutual Fund Scheme for investment check details on 02 March 2023.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x