15 November 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

Welspun Enterprises Share Price | जबरदस्त शेअर! 9 महिन्यांत 139% परतावा प्लस 75% डिव्हीडंड वाटप, चर्चेतील स्टॉकची डिटेल्स पहा

Welspun Enterprises Share Price

Welspun Enterprises Share Price | वेलस्पन एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने लाभांश वाटपाची जाहीर केलेली रेकॉर्ड तारीख या आठवड्यात आहे. आज या लेखात आपण या शेअर धारकांना बंपर लाभांश वाटप करणाऱ्या स्टॉकबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या स्टॉकमध्ये पैसे लावू इच्छित असाल तर तुम्हाला या आठवड्यात सुवर्णसंधी मिळणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Welspun Enterprises Share Price | Welspun Enterprises Stock Price | BSE 532553 | NSE WELENT)

लाभांश वाटप :
30 डिसेंबर 2022 रोजी ‘वेलस्पन एंटरप्रायझेस’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कंपनीने या बैठकीत आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी विशेष लाभांश पॅकेज मंजूर केला आहे. कंपनी प्रति शेअर 7.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 75 टक्के लाभांश वाटप करेल. वेलस्पन एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सनी मागील 9 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 139 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट :
वेलस्पन एंटरप्रायझेस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख 11 जानेवारी 2023 रोजी ही जाहीर करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्याच्या खात्यात लाभांश जमा केला जाईल. वेलस्पन एंटरप्रायझेस ‘T + 1’ सेटलमेंट श्रेणीमध्ये असल्याने, लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख आणि एक्स-डिव्हिडंड तारीख 11 जानेवारी 2023 रोजीच असेल. शेअर धारकांच्या खात्यात लाभांश 20 जानेवारी रोजी किंवा नंतर जमा केला जाईल.

शेअरची कामगिरी :
मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर वेलस्पन एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 162.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 170.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 174.80 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Welspun Enterprises Share Price 532553 WELENT check details on 10 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x