23 November 2024 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी टॉप ब्रोकिंग हाउसेसकडून खरेदीचा सल्ला, नवी टार्गेट प्राईस जाहीर होताच खरेदीला गर्दी

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने टाटा मोटर्सचा भाग असलेली उपकंपनी ‘Jaguar & Land Rover’ च्या मजबूत विक्री आणि मार्जिनमधील सुधारणेमुळे रेटिंग अपग्रेड केली आहे. CLSA ने टाटा मोटर्सच्या शेअर्सला ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE इंडेक्सवर 6 टक्क्यांच्या वाढीसह 413.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 416.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हे शेअर्स 500 रुपये पर्यंत जातील असा विश्वास CLSA ने व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)

टाटा मोटर्स शेअर्सची लक्ष किंमत :
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्ससाठी 512 रुपये ही लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच सोमवारच्या कलोजींग किमतीच्या तुलनेत टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 32 टक्के अधिक वाढू शकतात. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 417.70 रुपये किंमत स्पर्श केली होती. टाटा मोटर्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्छाक किंमत पातळी 528.35 रुपये होती. टाटा मोटर्स डीव्हीआर कंपनीच्या शेअर्सने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 223 रुपयांची उच्चांक उसळी घेतली होती. टाटा मोटर्स DVR कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 268.05 रुपये होती.

टाटा मोटर्सच्या रेटिंगमध्ये सुधारणा :
ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने ‘जग्वार लँड रोव्हर’ कडून व्यवसाय अपडेट घेतल्यावर टाटा मोटर्सची रेटिंग अपग्रेड करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. JLR माहिती दिली आहे की, ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा होलसेल सेल्स प्रमाण 79,591 युनिट्स होता. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सध्याचे घाऊक विक्रीचे प्रमाण 15 टक्के अधिक आहे. त्याच वेळी घाऊक विक्रीचे प्रमाण चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 5.7 टक्क्यांनी वधारले आहे.

सुधारणा आणि सकारात्मक विकास :
ICICI सिक्युरिटीज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, घाऊक डिस्पॅचमधील सुधारणा ही बाब कंपनीचा व्यवसाय वृध्दी साठी सकारात्मक गोष्ट आहे. चीनमध्ये कोविडने पुन्हा डोके वर काढल्याने मायक्रो चिप पुरवठा कमी झाला आहे. आणि लॉकडाऊनची शक्यता असतानाही या तिमाहीत कंपनीचे तिमाही निकाल चांगले आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tata Motors Share Price 500570 TataMotors in focus check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x