22 November 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Coal India Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने बँक FD पेक्षा 5 पट परतावा दिला, आता 50% देणार, ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

Coal India Share Price

Coal India Share Price | शेअर बाजारात योग्य शेअरमध्ये पैसे लावल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक वाढते. अशा परिस्थितीत मोतीलाल ओसवाल रिसर्च फर्मने 2023 मध्ये एका लार्जकॅप कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावण्याची शिफारस केली आहे. हा स्टॉक अल्पावधीत नक्कीच चांगला परतावा कमावून यावर तज्ञांचा विश्वास आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय, त्याचे नाव आहे, ‘कोल इंडिया’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Coal India Share Price | Coal India Stock Price | BSE 533278 | NSE COALINDIA)

कोल इंडियामध्ये होणारी अंदाजित वाढ :
ब्रोक्ररेज फर्मने ‘कोल इंडिया’ कंपनीच्या शेअर्ससाठी 325 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. एमओएसएल फर्मचा विश्वास आहे की, ‘कोल इंडिया कंपनी’ तिसऱ्या तिमाहीत ई-लिलावात अधिक चांगली कामगिरी करेल. हिवाळा सुरू असल्यामुळे विज निर्मितीसाठी कोळशाची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र पुढील काळात वीज निर्मितीसाठी कोळशाची मागणी वाढवल्यास कोल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा एमओएसएलने व्यक्त केली आहे. यामुळे पुढील तिमाहीत कोल इंडिया कंपनीच्या नफ्यात वाढ होईल, असे मोतीलाल ओसवाल फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे.

कोल इंडिया शेअरची कामगिरी :
कोल इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 216.30 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 263.40 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 149 रुपये होती. मागील एका आठवड्यात या स्टॉकमध्ये 4 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 6 टक्के पडला आहे.

मागील एका वर्षात कोल इंडिया कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. कोल इंडिया कंपनीच्या स्टॉकबाबत 22 पैकी 15 तज्ञांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यापैकी 8 जणांनी ‘स्ट्राँग बाय’ चा सल्ला दिला आहे. चार तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा तर तिघांनी स्टॉक विकुं बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. रिलायन्स सिक्युरिटीज फर्मने स्टॉकसाठी 230 रुपयांची लक्ष्य किंमती जाहीर केली आहे, आणि शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 213.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नऊ कोळसा खाण प्रकल्पांना मंजुरी
कोल इंडिया कंपनीने नऊ कोळसा खाण प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यासाठी लागणारे स्वीकृती पत्र ही जारी केले आहे. सुमारे 127 दशलक्ष टन कोळसा उत्पादन क्षमता असलेल्या खाणी कोल इंडिया माइन डेव्हलपर-कम-ऑपरेटर्सद्वारे विकसित करेल. याशिवाय इतर सहा खाण प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांत आहेत. भारतीय कोळसा मंत्रालयाने जाहीर निवेदनात माहिती दिली आहे की,” कोल इंडिया MDO च्या माध्यमातून 15 नवीन प्रकल्प सुरू करण्याची तयारी करत आहे. यामध्ये कंपनी 20,600 कोटी रुपये गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक कोल इंडिया द्वारे प्रामुख्याने भूसंपादन करण्यासाठी, पुनर्वसन आणि स्थलांतर यासाठी खर्च करेल.

एकूण 15 प्रकल्पांपैकी 11 ‘ओपनकास्ट’ म्हणजेच खुली खाण आहे, आणि चार खाण प्रकल्प भूमिगत आहेत. ओपनकास्ट खाण प्रोजेक्टमध्ये कोळशाचा अंदाजित 165 दशलक्ष टन साठा असण्याची शक्यता आहे. भारतात दगडी कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी आणि शक्य तितक्या प्रमाणात आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार खुल्या जागतिक निविदांद्वारे कोळसा खाणींमध्ये प्रतिष्ठित MDOs गुंतवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. खाण विकासक आणि ऑपरेटर पूर्व निर्धारित खाण योजनेनुसार कोळशाचे उत्खनन, प्रोसेस आणि वितरण करतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Coal India Share Price 533278 COALINDIA check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

Sarkari Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x