25 November 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620
x

Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल 95% स्वस्त झाले, पण आता रोज 5% वाढतोय, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स तुफानी वेगाने धावत आहेत. अवघ्या 7 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 33 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आज बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 11.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)

रिलायन्स कॅपिटल शेअरची कामगिरी :
मागील वर्षी या कंपनीला प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागला होता. रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स मागील 5 वर्षात 98 टक्के गडगडले आहेत. या काळात शेअरची किंमत 600 रुपयेवरून सध्याच्या 11.70 रुपयेपर्यंत आली आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 216 रुपयांवरून खाली आहे. म्हणजेच या कालावधीत स्टॉकमध्ये 95 टक्के पडझड पाहायला मिळाली होती.

कंपनी विकण्याची डील चालू आहे :
NCLT ने सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीसाठी बोली लावणाऱ्या ‘टोरेंट ग्रुप’ चा अर्ज रद्द केला आणि लिलावाच्या दुसऱ्या फेरीला स्थगिती दिली. कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटल कंपनीची ‘कमिटी ऑफ क्रेडिटर्स’ म्हणजेच कंपनीला कर्ज देणारे गुंतवणुकदार लिलावाच्या पहिल्या फेरीत लावण्यात आलेल्या किमतीवर समाधानी नाही. म्हणून COC कंपनीच्या लिलावाची दुसरी फेरी आयोजित करण्याचा विचार करत आहे. दुसरी फेरी आयोजित करण्याच्या प्रस्तावावर COC च्या मतदानाची फेरी लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

21 डिसेंबर 2022 रोजी लिलावाची पहिली फेरी आयोजित करण्यात आली होती, त्यात ‘टोरेंट ग्रुप’ आणि ‘हिंदुजा ग्रुप’ मोठी बोली लावली होती. यामध्ये टोरेंट उद्योग समूहाने सर्वाधिक 8640 कोटी रुपयांची बोली लावली होती. हिंदुजा उद्योग समूहाची कंपनी ‘इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज’ने या लिलावात 8110 कोटी रुपयांची प्रारंभिक बोली लावली. या दोन्ही बोली रिलायन्स कॅपिटलच्या 13,000 कोटी रुपयांच्या लिक्विडेशन किंमतीपेक्षा कमी आहेत. या कारणास्तव RCL कंपनीचे कर्जदार नव्याने लिलाव आयोजित करण्याचा विचार करत आहेत. या राऊंडसाठी कंपनीची फ्लोअर प्राइस 9,500 कोटी रुपये निश्चित केली जाईल.

संचालक मंडळ बरखास्त :
मागील वर्षी नोव्हेंबर 202 मध्ये रिझर्व्ह बँकेने रिलायन्स कॅपिटल कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागी प्रशासक या पदावर ‘नागेश्वर राव वाय’ यांना नियुक्त केले होते. रिलायन्स कॅपिटल कंपनी दिवाळखोरी संहिते अंतर्गत लिलावासाठी जाणारी आतापर्यंतची तिसरी ‘NBFC’ कंपनी आहे. याआधी ‘स्रेई ग्रुप’ आणि ‘डीएचएफएल’ कंपनीचा देखील लिलाव झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price 500111 RELCAPITAL in focus check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

Relience Capital Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x