25 November 2024 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Paytm Share Price | पेटीएम शेअरची किंमत 74% घसरली, तरीही तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा, कारण वाचा

Paytm Share Price

Paytm Share Price | ‘पेटीएम’ या भारतीय फिनटेक कंपनीला मजबूत झटका बसला आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.82 टक्के पडले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका मोठ्या ब्लॉक डीलनंतर पाहायला मिळाली आहे. चीनच्या ‘Alibaba Group’ ने ब्लॉक डीलद्वारे ‘पेटीएम’ कंपनीतील आपले 3.1 टक्के भाग भांडवल विकले आहेत. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘One97 कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 1.02 टक्क्यांच्या घसरणीसह 537.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

ब्लॉक डील सविस्तर माहिती :
स्टॉकमार्केट मधील ब्लॉक डील डाटानुसार सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत ‘पेटीएम’ कंपनीतील एकूण भाग भांडवलपैकी 6.26 टक्के भाग भांडवल ‘Alibaba Group’ कडे होता. ‘Alibaba Group’ ने ब्लॉक डीलद्वारे पेटीएम कंपनीतील 3.1 टक्के भागभांडवल 125 दशलक्ष डॉलर्समध्ये 536.95 रुपये प्रति शेअर या किंमतीवर विकले आहेत. पेटीएम कंपनीने मागील महिन्यात 850 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होती. ‘पेटीएम’ कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी शेअरची इश्यू किंमत 2,150 रुपये निश्चित करण्यात आली होती. पेटीएम शेअर आपल्या IPO इश्यू किमतीच्या 74.5 टक्के कमजोर झाले आहेत.

Paytm ची बिकट अवस्था :
2022 मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा स्टॉक म्हणून पेटीएम शेअरची नोंद झाली आहे. तथापि शेअर बाजारातील तज्ञ या स्टॉकवर अजूनही उत्साही आहेत. तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पेटीएम स्टॉकवर 11 पैकी 8 तज्ञांनी ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर ट्रेंडलाइन डेटानुसार पेटीएम स्टॉक पुढील काळात 66 टक्के पर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात माहिती दिली होती की, पेटीएम या फिनटेक कंपनीला आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ‘Rupay डेबिट कार्ड’ आणि कमी मूल्याच्या ‘BHIM-UPI’ व्यवहारच्या जाहिरातीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या UPI प्रमोशन योजनेचा लाभ होईल. यातून कंपनीला 2600 कोटी रुपयांचा फायदा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 in focus check details on 13 January 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x