22 April 2025 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Droneacharya Aerial Innovations Share Price | या शेअरने 14 दिवसात पैसे 4 पट केले, आता स्टॉक किंमतीची उलटी गंगा, कारण?

Droneacharya Aerial Innovations Share Price

Droneacharya Aerial Innovations Share Price | ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ या पुणे स्थित ड्रोन स्टार्टअप कंपनीचे सूचीबद्ध झाल्यापासून सतत अप्पर सर्किट वर हिट करत आहेत. स्टॉक लिस्ट झाल्यापासून सलग 14 ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक अप्पर सर्किटला हिट झाला होता. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 209.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या नक्कीच स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आहे, म्हणून शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. या ड्रोन सोल्यूशन्स स्टॉकची 23 डिसेंबर 2022 रोजी BSE-SME एक्सचेंजमध्ये लिस्टिंग झाली होती. शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 325 टक्क्यांनी मजबूत झाला होता. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ डिसेंबर 2022 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची किंमत बँड 52 ते 54 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

शेअर किंमतीचा इतिहास :
डिसेंबर 2022 मध्ये ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीने आपला IPO 52 ते 54 रुपये प्रति इक्विटी शेअर या प्राइस बँडवर गुंतवणुकीसाठी खुला केला होता. 23 डिसेंबर 2022 रोजी BSE-SME इंडेक्सवर शेअर्स 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ज्या नशीबवान गुंतवणुकदारांना हे IPO शेअर्स मिळाले होते, त्यांना 90 टक्के लिस्टिंग प्रॉफिट मिळाला होता. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअरची किंमत 90 टक्के वाढली होती. तेव्हापासून या ड्रोन स्टॉकमध्ये सतत 5 टक्के अप्पर सर्किट लागत होता. 23 डिसेंबर 2022 रोजी बीएसई-एसएमई एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून सलग 14 ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर सर्किटवर ट्रेड करत होता.

मल्टीबॅगर IPO परतावा :
मागील एका महिन्यात या ड्रोन कंपनीचा स्टॉक मल्टीबॅगर परतावा देणारा IPO ठरला आहे. कंपनीने आपला IPO प्रति इक्विटी शेअर 52-54 रुपये किमतीवर जारी केला होता. एक IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स जारी करण्यात आली होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना किमान 1.08 लाख रुपये जमा करावे लागले होते. ज्या लोकांना IPO शेअर वाटप करण्यात आले, त्यांच्या 1.08 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य लिस्टिंग च्या पहिल्याच दिवशी 4.40 लाख झाले होते.

अप्पर सर्किट म्हणजे काय? :
जेव्हा एखादा स्टॉक प्रमणापेक्षा जास्त खरेदी केला जातो तेव्हा त्या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट हिट होतो. म्हणजेच एक्सचेंजमध्ये त्या शेअर्सचे व्यवहार थांबते. हे सर्व मार्केट रेग्युलेटर सेबीने बनवलेल्या नियमांनुसार होते. भारतीय शेअर बाजारातील अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट व्यवहार 28 जून 2001 पासून सुरू झाला आहे. सर्किट लिमिट NSE किंवा BSE मधील निफ्टी आणि सेन्सेक्स यांसारखे निर्देशांक एका दिवसात किती वर आणि खाली जाऊ शकतात, याची मर्यादा निश्चित करते. यामध्ये 5 टक्के, 10 टक्के, 15 टक्के, 20 टक्के चे फिल्टर असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Innovations Share Price 543713 in focus check details on 13 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या