22 November 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Nippon Mutual Fund | करोडमध्ये परतावा देतेय ही म्युचुअल फंड योजना, SIP ने 1.4 कोटी रुपये परतावा, योजनेचं नाव काय?

Nippon Mutual Fund

Nippon Mutual Fund | 2022 च्या शेवटच्या महिन्यात S & P BSE सेन्सेक्स इंडेक्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह लाल रंगावर क्लोज झाला होता. याशिवाय संपूर्ण 2022 या वर्षात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2.78 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकून आपली गुंतवणूक काढून घेतली. तथापि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 2022 या वर्षाच्या अखेरीस FII कडून येणारा विक्रीचा दबाव कमी करण्यास हातभार लावला होता. दरम्यान मागील एका वर्षभरात स्मॉल-कॅप्स कंपनीच्या शेअर्सनी खूप चांगली कामगिरी केली आहे. तथापि स्मॉल-कॅप फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना ही बंपर नफा कमावून दिला आहे. स्मॉल कॅप म्युचुअल फंडानी केवळ बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकले नाही तर, उत्तम परतावा ही मिळवून दिला आहे. निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप म्युचुअल फंड देखील त्यापैकी एक आहे. (Nippon India Small Cap Fund – Direct Plan NAV)

निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप म्युचुअल फंड
निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप म्युचुअल फंड सप्टेंबर 2010 मध्ये लाँच करण्यात आला होता. ही योजना निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड हाऊसने ऑफर केली आहे. सप्टेंबर 2010 मध्ये ही योजना गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली होती. म्युचुअल फंडाने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 19.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात दरमहा 20,000 SIP गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आता 1.4 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाच्या SIP प्लॅनने सरासरी वार्षिक 23.41 टक्के परतावा कमावून दिला आहे.

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ
निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप म्युचुअल फंड योजना मुख्यतः स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावते. ही स्कीम स्मॉल कॅप स्पेसवर अधिक लक्ष केंद्रित करते. स्मॉल कॅप कंपन्यांचे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ ऑपरेट करण्यात योजना आघाडीवर आहे. मात्र स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे, थोडे धोक्याचे आहे. म्हणूनच स्मॉल कॅप म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःची जोखीम क्षमता समुजन घेऊन पैसे लावणे फायद्याचे राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nippon Mutual Fund Small Cap Fund Direct Plan NAV check details on 14 January 2023.

हॅशटॅग्स

Nippon mutual fund(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x