Yes Bank Share Price | 20 रुपयाच्या येस बँक शेअरला 44 रुपयांची टार्गेट प्राईस, स्टॉक सोमवारपासून पुन्हा तेजीत येणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सने 13 डिसेंबर 2022 रोजी 27.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तथापि उच्चांकावर गेल्यानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये थोडा प्रॉफिट बुकींग सुरू झाला. हा स्टॉक शेअर बाजारात ‘सेल ऑन राइज’ स्टॉक म्हणून ओळखला जातो. येस बँकेच्या शेअरची किमत सध्या खूप आकर्षित आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 20.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
उच्चांकावरून शेअर 20 टक्के पडला :
येस बँकेच्या शेअरमध्ये मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये तीव्र विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअरने 19.65 रुपये ही आपली नीचांक पातळी गाठली होती. मागील एका महिन्यात येस बँक शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 20 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, IDFC फर्स्ट बँक, अक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादी प्रमुख बँकांचा तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी मार्च 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. म्हणून हे बँकिंग स्टॉक मार्च 2023 पर्यंत अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकिंगमुळे स्टॉक कमजोर झाला आहे. येस बँकेच्या शेअरची किंमत मागील तीन वर्षांत दुप्पट वाढली आहे. आणि शेअरचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर या बँकाच्या शेअरमध्ये मार्च 2023 मध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू होईल. ब्रोकरेज फर्मने म्हंटले आहे की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आल्यानंतर येस बँकेच्या कामात जबरदस्त सुधारणा झाली आहे. याशिवाय बँकेचे बुडीत कर्ज आणि इतर आर्थिक समस्यांचा सामना करण्यासाठी वित्त मंत्रालय येस बँकेसह इतर सर्व नुकसानग्रस्त बँकांना मदत करणार आहे.
येस बँक शेअरची लक्ष किंमत :
येस बँक स्टॉक पुढील कालावधीत 36 ते 44 रुपये पर्यंत वाढू शकतो. तज्ञांनी स्टॉकमध्ये 17 रुपये स्टॉप लॉस लावण्याची शिफारस केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये येस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यावर स्टॉक मार्केट तज्ञ म्हणाले की, “येस बँक शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत गाठल्यानंतर शेअर्समध्ये किरकोळ गुंतवणूकदारानी प्रॉफिट बुकींग सुरू केली आहे. अॅक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक इत्यादीं बँकेच्या शेअर्सचा लॉक-इन कालावधी पूर्ण होणार आहे. मागील तीन वर्षांत येस बँकेच्या शेअरची किमत 100 टक्क्यांनी वधारली आहे. शेअर्सचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर त्यात प्रॉफिट बुकींग होऊन शेअरची किंमत आणखी खाली येऊ शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK check details on 14 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल