22 November 2024 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Communications Share Price | टाटा तिथे नो घाटा! रेखा झुनझुनवालांनी टाटा ग्रुपचा हा शेअर खरेदी केला, स्टॉकमध्ये तेजी येणार?

Tata Communications Share Price

Tata Communications Share Price | रेखा झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ फॉलो करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. झुनझुनवाला यांनी टाटा उद्योग समूहातील टाटा कम्युनिकेशन या कंपनी मधील आपली गुंतवणुक वाढवली आहे. सध्या रेखा झुनझुनवाला यांची टाटा कम्युनिकेशन्स कंपनीमधील गुंतवणूक 1.79 टक्क्यांपर्यंत गेली आहे. चला तर मग जाणून घेऊ रेखा झुनझुनवाला यांच्या टाटा कम्युनिकेशन्स कंपनीमधील गुंतवणुकीबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Communications Share Price | Tata Communications Stock Price | BSE 500483 | NSE TATACOMM)

टाटा कम्युनिकेशन्स शेअर होल्डिंग पॅटर्न :
सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीपर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे 1.61 टक्के भाग भांडवल होते. मात्र आता डिसेंबर 2022 च्या तिमाहीत हे प्रमाण 1.79 टक्केवर गेले आहे. याचा अर्थ रेखा झुनझुनवाला यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे. या तिसऱ्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी आपली गुंतवणूक 0.18 टक्क्यांनी वाढवली आहे. ज्यां गुंतवणूकदारांकडे एखाद्या कंपनीचे 1 टक्क्यांहून अधिक भाग भांडवल असतात, त्यांचे नाव कंपनीच्या वैयक्तिक शेअर धारकांच्या यादीत सामील होते.

नुकताच संपलेल्या तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नवीनतम शेअरहोल्डिंग डेटानुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे 51,00,687 शेअर्स आहेत. दुसऱ्या तिमाहीपर्यंत त्यांच्याकडे 45,75,687 शेअर्स होते. म्हणजेच या कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 1.61 टक्के होती, जी आता 0.18 टक्के वाढली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी 5,25,000 शेअर्स खरेदी केले आहेत.

टाटा कम्युनिकेशन्स शेअर किंमत इतिहास :
मागील 6 महिन्यांत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या काळात टाटा उद्योग समूहाचा भाग असलेला हा शेअर 41.73 टक्के मजबूत झाला होता. त्याच वेळी मागील 1 महिन्यात या कंपनीने आपल्या पोझीशनल गुंतवणूकदारांना 1.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1591.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 856.25 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Communications Share Price 500483 TATACOMM in focus check details on 14 January 2023.

हॅशटॅग्स

Tata Communications Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x