22 November 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Chaman Metallics Share Price | या शेअरने 1 दिवसात 75% परतावा दिला, शेअर आजही स्वस्त, स्टॉक आता खरेदी करावा का?

Chaman Metallics Share Price

Chaman Metallics Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमधे एका धमाकेदार IPO स्टॉकची लिस्टिंग शेअर बाजारात पाहायला मिळाली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलतोय त्याचे नाव आहे, ‘चमन मेटॅलिक्स’. मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 61.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल स्टॉक लिस्टिंगनंतर काही वेळात कंपनीच्या शेअर्समध्ये घसर सुरू झाली होती. NSE इंडेक्सवर शेअरची किंमत 64 रुपयांवर क्लोज झाली होती. आणि आज शेअरची सुरुवात लाल निशाणीवर झाली आहे. चमन मेटॅलिक्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 38 रुपये निश्चित केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Chaman Metallics Share Price | Chaman Metallics Stock Price| NSE CMNL)

एका दिवसात 78 टक्के नफा :
‘चमन मेटॅलिक्स’ कंपनीचे शेअर्स 68 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. चमन मेटालिक्स कंपनीच्या शेअर बाजारात पदार्पण करताच पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणुकदारांना 78 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीचे IPO शेअर्स मिळाले, त्यांना लिस्टिंग च्या दिवशी प्रति शेअर 30 रुपये नफा मिळाला आहे. आज मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे कारण गुंतवणुकदारांना प्रॉफिट बुकींग सुरू केली आहे. या कंपनीच्या IPO मध्ये अर्ज केलेल्या लोकांना एका दिवसात 70 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळाला आहे.

कंपनीच्या IPO बद्दल तपशील :
1) चमन मेटालिक्स कंपनीच्या IPO शेअरची प्राइस बैंड : 38 रुपये
2) IPO उघडण्याची तारीख 4 जानेवारी 2023 होती.
3) Chaman Metaliks IPO ची मुदत 6 जानेवारी 2023 संपली होती.
4) 11 जानेवारी 2023 IPO शेअरचे वाटप करण्यात आले होते.
5) कंपनीने एका IPO लॉटमध्ये 3000 शेअर्स दिले आहेत.
6) IPO मध्ये शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर होती.
7) या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणुकदारांना करावी लागणारी किमान गुंतवणूक : 1,14,000 रुपये
8) कंपनीमध्ये पोस्ट IPO प्रमोटरची शेअर होल्डिंग : 73.60 टक्के आहे.
9) चमन मेटॅलिक कंपनीचा IPO SME इंडेक्समध्ये लिस्ट झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Chaman Metallics Share Price CMNL in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

Chaman Metallics Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x