22 November 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Adani Green Energy Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये तुफानी वाढ, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?

Adani green Energy share price

Adani Green Energy Share Price | मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के वाढीसह 2165 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज भारतीय शेअर बाजार रोलर कोस्टरसारखा अस्थिर पाहायला मिळाला. आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. या कालावधीत बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 55,000 कोटी रुपयांनी कमी होऊन 280.71 लाख कोटी रुपये झाले आहेत. अशा घसरणीच्या काळातही अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स सुसाट धावत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Green Energy Share Price | Adani Green Energy Stock Price | BSE 541450 | NSE ADANIGREEN)

अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये वाढ :
चालू आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. परंतु यादरम्यान आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘गौतम अदानी’ यांच्या कंपनीच्या शेअरने उसळी घेतली होती. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले होते. आणि मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के वाढीसह क्लोज झाले आहेत. स्टॉक मधील तेजी पाहता तज्ज्ञांनी अदानी ग्रीन शेअरसाठी 2600 रुपये ही नवीन लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. एका दिवसात शेअरची किंमत 11.98 टक्के वाढीसह 2141 रुपयेवर पोहचली होती. याआधी मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 1,912.30 रुपयांवर क्लोज झाले होते. मात्र दिवसा अखेर शेअर मधील तेजी कमी होत गेली. मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर 2165 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आज अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2165 रुपये किमतीवर क्लोज झाले. सोमवारी या कंपनीच्या शेअर्सनी 9.78 टक्के म्हणजेच 187.35 रुपये वाढ नोंदवली आहे. शेअरची किंमत पातळी कंपनीच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपेक्षा कमी आहे. 19 एप्रिल 2022 रोजी अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स 3,048 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरची किंमत घसरली आणि अजूनही शेअरची किंमत उच्चांक किंमत पातळीपेक्षा कमी आहेत.

अदानी शेअर्सबाबत तज्ज्ञांचा सल्ला :
कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ पाहता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी 1,700 रुपये स्टॉप लॉस लावून 2,600 च्या लक्ष्य किंमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी उद्योग समूहाच्या 7 पैकी पाच सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. या पूर्वी अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरमध्ये वाढ पाहायला मिळाली होती. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मार यांच्या शेअर्समध्ये ही दोन टक्क्यांपेक्षा अधिक पडझड पाहायला मिळाली होती.

सेन्सेक्स मध्ये किंचित वाढ :
बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही निर्देशांक आज हिरव्या निशाणीवर बंद झाले. तर सेन्सेक्स 562.72 अंकांच्या वाढीसह 60655.72 च्या पातळीवर बंद झाला आहे. त्याचवेळी निफ्टी-50 निर्देशांक 158.45 अंकांच्या वाढीसह 18053.30 अंकांवर बंद झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani green Energy Share Price 541450 ADANIGREEN in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Energy Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x