22 November 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Federal Bank Share Price | बँक FD नव्हे, या बँकेचा शेअर बनवेल श्रीमंत, दिग्गज गुंतवणूदारांकडून खरेदी, तज्ञांनी दिले मोठे संकेत

federal Bank Share price

Federal Bank Share Price | सध्या जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून मजबूत पस्तावा कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘फेडरल बँक’ च्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. बँकेच्या उत्कृष्ट तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या स्टॉकबाबत अतिशय उत्साही आहेत. या खाजगी क्षेत्रातील बँकिंग स्टॉकवर तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ सध्याच्या किमतीवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. वास्तविक डिसेंबर 2022 तिमाहीत फेडरल बँकेने 54 टक्के बंपर नफा कमावला आहे. फेडरल बँकेने डिसेंबर 2022 च्या Q3 मध्ये तिमाहीत 804 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत फेडरल बँकेने 522 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 1.09 टक्के घसरणीसह 136.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Federal Bank Share Price | Federal Bank Stock Price | BSE 500469 | NSE FEDERALBNK)

फेडरल बँक तिमाही निकालाबाबत :
डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत फेडरल बँकेचा नफा मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 54 टक्क्यांनी वाढला असून 804 कोटी रुपयेवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिसेंबर तिमाहीत फेडरल बँकेने 522 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. फेडरल बँकेने सोमवारी स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला कळवले आहे की, डिसेंबर तिमाहीत फेडरल बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 4,967 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत फेडरल बँकेने 3,927 कोटी रुपये कमाई केली होती.

तज्ञ काय म्हणतात ?
ब्रोकरेज हाऊसने फेडरल बँक स्टॉकवर ‘ BUY ‘ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फेडरल बँक मिड कॅप कंपनी आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की, पुढील पाच वर्षांत फेडरल बँक सरासरी 0.9 टक्के च्या ROA विरुद्ध FY25 मध्ये 1.4 टक्के उच्च ROA देऊ शकते. एडलवाईस फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, फेडरल बँक FY22-25 मध्ये 28 टक्के EPS CAGR प्रमाण प्राप्त करेल. फेडरल बँक स्टॉकवर ब्रोकरेज फर्मनी 180 रुपये प्रति शेअर ही सुधारित लक्ष किंमत जाहीर केली आहे. पूर्वी तज्ञांनी स्टॉकवर 160 रुपये लक्ष किंमत दिली होती, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने फेडरल बँकेच्या FY23-25 मधील कमाईच्या अंदाजात अनुक्रमे 2 टक्के ते 5 टक्के एवढी मोठी सुधारणा केली. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने फेडरल बँक शेअरची लक्ष्य किंमत 160 रुपयेवरून 170 पर्यंत अपडेट केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Federal Bank Share Price 600469 in focus check details 18 January 2023.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x