23 November 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Stocks To Buy | बँक FD नव्हे, हे 3 शेअर्स 65% पर्यंत परतावा देतील, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स

Stocks to Buy

Stock To Buy | मागील 1-2 वर्षात शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: कोरोना नंतरच्या काळात अनेक नवीन गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावल्याने ते वाढतील याची हमी ​​नाही. गुंतवणूक करण्यासाठी योग्य संशोधन आणि संयम असणे आवश्यक आहे. योग्य स्टॉकमध्ये पैसे लावल्यास परतावा मिळतो हे नक्की. एखादी बातमी ऐकून किंवा कोणाकडून टिप्स घेऊन गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला स्टॉक संशोधन करता येत नसेल तर तुम्ही ब्रोकरेज फर्मचा सल्ला घेऊ शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला 3 जबरदस्त शेअरची माहिती देणार आहोत, जे भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने खास गुंतवणुकीसाठी निवडले आहेत.

मोतीलाल ओसवाल या प्रसिद्ध भारतीय गुंतवणुक कंपनीने 3 स्टॉक्स निवडले आहेत ज्यात तुम्ही हमखास पैसे लावू शकता. मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांना या 3 कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास पुढील काळात तुम्हाला 65 टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो.

Angel One Ltd :
मोतीलाल ओसवाल या गुंतवणूक फर्मने 2,100 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी Angel One Ltd कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी एंजल वन कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 1278.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तुम्ही या किमतीवर एंजेल वन कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास अल्पावधीत तुम्हाला 65 टक्के परतावा मिळू शकतो. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2022.00 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1065.85 रुपये होती. ही कंपनी सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 1 महिन्यात 11.18 टक्के, मागील 6 महिन्यांत 1.51 टक्के, आणि मागील 1 वर्षात 10.75 टक्के कमजोर झाली आहे. या कंपनीची स्थापना 1996 मध्ये झाली होती.

एरिस लाइफसायन्सेस :
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने ‘एरिस लाइफसायन्सेस’ कंपनीचे शेअर्स 780 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 दिही या कंपनीचा शेअर 0.71 टक्के वाढीसह 637 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सध्या जर तुम्ही एरिस लाइफसायन्सेस कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर पुढील काळात तुम्हाला 24 टक्के नफा मिळू शकतो. कंपनीचे मार्केट कॅप 8,604.13 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 766.00 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 600.50 रुपये होती. फार्मा सेक्टरमधील या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 24 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 1 वर्षात या स्टॉकची किंमत सुमारे 16 टक्के कमजोर झाली आहे. या मिड कॅप कंपनीची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली होती.

बँक ऑफ इंडिया :
मोतीलाल ओसवाल फर्मने सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मात्र मोतीलाल ओसवाल फर्मने या स्टॉकसाठी कोणतीही लक्ष किंमत जाहीर केली नाहीये. बँक ऑफ इंडिया स्टॉक सध्या 1.12 टक्के वाढीसह 90.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉक आज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप 36,685.88 कोटी रुपये आहे. बँक ऑफ इंडिया शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 103.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 40.40 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy recommended by Motilal Oswal firm check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x