25 November 2024 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
x

Tata Communication Share Price | टाटा तिथे नो घाटा, प्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनीकडून टाटा कम्युनिकेशन शेअरची जोरदार खरेदी

Tata Communication Share price

Tata Communication Share Price | जर तुम्ही शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांचा पोर्टफोलओ फॉलो करून पैसे लावत असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाने ‘टाटा कम्युनिकेशन’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. DSP म्युच्युअल फंडाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे 5500 शेअर्स खरेदी केले आहेत. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटापॅटर्नमध्ये या म्युचुअल फंडाच्या गुंतवणूकीची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही म्युचुअल फंड तज्ज्ञांच्या गुंतवणूक स्ट्रेटरजीनुसार पैसे लावू इच्छित असाल तर या कंपनीची आर्थिक कामगिरी माहीत असणे तुमच्या फायद्याचे राहील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Communications Share Price | Tata Communications Stock Price | BSE 500483 | NSE TATACOMM)

स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
चॉईस ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणतात, “टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या चार्ट पॅटर्नवर स्टॉकमध्ये तेजी येण्याचे संकेत मिळत आहे. तज्ञांनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1350 रुपये स्टॉप लॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शॉर्ट टर्म टार्गेट किंमत 1450 रुपये ते 1500 रुपये दरम्यान निश्चित केली आहे.

शेअरची कामगिरी :
शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी टाटा कम्युनिकेशन कंपनीचे शेअर 1.98 टक्के घसरणीसह 1344 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 4.54 टक्क्यांनी वर गेली आहे. तर दुसरीकडे सहा महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 38 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,540 रुपये होती. ते शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 856.25 रुपये होती. मागील 3 वर्षांत टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कम्युनिकेशन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Communications Share Price 500483 TATACOMM in focus check details on 20 January 2023.

हॅशटॅग्स

Tata Communication Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x