23 November 2024 4:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | सोनं नव्हे सोन्या संबंधित या दोन कंपन्यांचे शेअर्स पैशाचा पाऊस पडतील, तज्ञांचा खरेदीचा सल्ला

Stock to buy

Stocks To Buy | MCX वर सोन्याची किंमत 56,677 रुपये प्रति तोळा या सार्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचली आहे. सोन्याने आपला 56,588 रुपये ही मागील उच्चांकी किंमत तोडली आहे. सोन्यामध्ये आलेल्या तेजीचा फायदा तुम्ही घेऊ शकता, तेपण बिना सोने खरेदी करता. सोन्यामध्ये आलेल्या तेजीमुळे सोने तारण ठेवून कर्जाचे व्यवहार करणाऱ्या बँकांना जबरदस्त फायदा होईल, असे मात्र शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोन्याच्या किमतीत आलेल्या तेजीमुळे कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांचे गोल्ड लोन ऑर्डर बुक अधिक वाढले. आणि त्या कंपन्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये सुधारणा होईल. म्हणूनच सोन्यातील तेजी पाहून शेअर बाजारातील तज्ञांनी ‘मुथूट फायनान्स’ आणि ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Muthoot Finance Share Price | Muthoot Finance Stock Price | Manappuram Finance Share Price | Manappuram Finance Stock Price)

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “सोन्यामध्ये आलेली ही तेजी संभाव्य आर्थिक मंदीच्या भीतीने दीर्घ काळ चालू राहू शकते. सोने तारण ठेवून कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि मुख्यतः ‘मुथूट फायनान्स’ आणि ‘मणप्पुरम फायनान्स’ सारख्या वित्तीय कंपन्या सोन्यामध्ये आलेल्या तेजीचा अधिक फायदा होऊ शकतो. हेच कारण आहे की, शेअर बाजारातील तज्ञांनी या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सोन्याची किंमत सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचली आहे. याचा फायदा सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या लोकांना होईल. लोकांना त्यांनी पूर्वी गुंतवणूक केलेले सोने गहाण ठेवून अधिक कर्ज मिळवता येईल. दुसरीकडे सावकारांनाही त्यांच्या गोल्ड लोन ऑर्डर बुकमध्ये वाढ झाल्यामुळे फायदा होईल कारण सोने तारण ठेवून लोक त्यांच्याकडून अधिक पैसे कर्ज स्वरूपात घेतील. सोन्यामध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे गुंतवणुकदारांना आर्थिक मंडी ची भीती वाटत असून त्यांनी शेअर बाजारातील पैसे सोन्याकडे वळवायला सुरुवात केली आहे. आणि त्याचा फायदा वित्तीय कंपन्याना कर्ज पुरवठा करण्यासाठी होऊ शकतो.

मुथूट फायनान्स कंपनीचे शेअर
मुथूट फायनान्स कंपनीचे शेअर पुढील काळात 1,300 रुपये पर्यंत जाऊ शकतात, असे भाकीत तज्ञांनी वर्तवले आहे. जर तुम्ही मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअरची 1,000 रुपये किंमत पातळीजवळ मजबूत सपोर्ट लेव्हल आहे. तर 1,150 रुपये किंमत पातळीच्या जवळ त्वरित प्रतिकार लेव्हल निर्माण झाला आहे. जर या स्टॉकने 1,150 रुपये किमतीच्यावर ब्रेकआउट दिला तर अल्पावधीत हा स्टॉक 1,300 रुपये किंमत पातळी ओलांडू शकतो. तज्ञांनी स्टॉक सध्याच्या किंमत पातळीवर खरेदी करून 1,300 रुपये किंमत पातळीपर्यंत होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1,000 रुपयेवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे.

मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर
मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 140 रुपये किंमत पातळीवर जाऊ शकतात, असा अंदाज चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे. जर मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने 125 रुपयेवर नवीन ब्रेकआउट दिला तर हा स्टॉक अल्पावधीत 140 रुपये किंमत पातळी ओलांडू शकतो. तज्ञांनी हा स्टॉक 105 रुपयेवर स्टॉप लॉस लावून सध्याच्या किंमत पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांना सोन्याच्या किमतीत जबरदस्त आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. सोन्याची किंमत अल्पावधीत 57,000 रुपये प्रति तोळा वर जाण्याची शक्यता आहे. या वर्षी दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60,000 रुपये पार करेल असे तज्ञ म्हणतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to Buy call on Muthoot Finance Ltd and Manappuram Finance Ltd on 21 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x