Yes Bank Share Price | येस बँक शेअरची किंमत 1 दिवसात 7.09% पडली, पडझडीचे नेमकं कारण काय? आता काय करावं?
Yes Bank Share Price | डिसेंबर 2022 तिमाहीत ‘येस बँक’ ने जाहीर केलेल्या निकालानुसार बँकेचा एकत्रित निव्वळ नफा 79 टक्क्यांनी घटून 55.07 कोटी रुपयेवर आला आहे. शनिवारी येस बँक ने आपला तिमाही निकाल जाहीर केला आणि त्यात बँकेने माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जासाठी अधिक तरतुदी केल्याने बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी येस बँक शेअर 7.09 टक्के घसरणीसह 18.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून येस बँक स्टॉक चर्चेचा विषय बनले आहेत. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.99 टक्के कमजोरीसह 19.75 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील चार वर्षांत येस बँक शेअरची किंमत 94 टक्के घसरली आहे. तथापि मागील एका वर्षात या शेअरची किंमत 47 टक्के वर गेली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
येस बँकेचे वित्तीय नियोजन :
नुकताच संपलेल्या तिमाहीत येस बँकेने आगाऊ वितरणामध्ये 10 टक्के आणि निव्वळ व्याज मार्जिनमध्ये 0.10 टक्के वाढ नोंदवली आहे. यासह येस बँकेचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न 11.7 टक्क्यांच्या वाढीसह 1,971 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. येस बँकेचे बिनव्याजी उत्पन्न 55.8 टक्क्यांच्या वाढीसह 1,143 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. येस बँकने कॉर्पोरेट बाँड्सच्या विक्रीतून 100 कोटी रुपये कमाई केली आहे. तर ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत येस बँकेच्या तरतुदीमध्ये वाढ झाली असून वार्षिक तरतुदी 375 कोटी रुपयांवरून 845 कोटी रुपयांवर गेली आहे.
येस बँकेचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक ‘प्रशांत कुमार’ यांनी तिमाही निकाल जाहीर करताना माहिती दिली की, जुन्या बुडीत मालमत्तेमुळे येस बँकेचा तरतूदीत वाढ झाली आहे. बँकेने आतापर्यंत 4,300 कोटी रुपये कर्जे वसूल केला असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपर्यंत कर्जवसुली 1,000 कोटी रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासोबतच येस बँक 8400 कोटी रुपयांच्या AT-1 बाँड प्रकरणात आपल्या बाजूने न्याय मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 2020 साली दिलेल्या आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती दिली आहे. येस बँकेने AT-1 बाँड वाढवण्याच्या बाजूने मजबूत कायदेशीर आधार असल्याचे म्हंटले आहे.
जर तुम्ही येस बँकेचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, 2 फेब्रुवारी 2018 रोजी येस बँकेचे शेअर 349 रुपयांवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी येस बँक स्टॉक 7.34 टक्के घसरणीसह 18.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच 2018 नंतर स्टॉकमध्ये 94 टक्के घसरण झाली आहे. या कालावधीत जर तुम्ही येस बँक शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5,000 रुपयांवर आले असते. YTD आधारावर शेअरची किंमत 8.78 टक्के पडली असून मागील पाच दिवसांत येस बँक स्टॉक 8.73 टक्के कमजोर झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK check details on 23 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार