22 November 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Mazagon Dock Shipbuilders Share Price | मस्तच! सरकारी कंपनीच्या शेअरने 6 महिन्यांत 185% परतावा दिला, स्टॉक डिटेल वाचा

Mazagon Dock Shipbuilders Share Price

Mazagon Dock Shipbuilders Share Price | भारतीय सेनेसाठी पाणबुडी, युद्ध नौका आणि जहाजे बनवणाऱ्या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘माझगांव डॉक शिपबिल्डर्स’. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्स आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 240 टक्के पेक्षा अधिक वाढवले आहेत. ‘माझगांव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 936.85 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224 रुपये होती. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के वाढीसह 769.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mazagon Dock Shipbuilders Share Price | Mazagon Dock Shipbuilders Stock Price | BSE 543237 | NSE MAZDOCK)

1 लाखावर दिला 3 लाख परतावा :
‘माझगांव डॉक शिपबिल्डर्स’ या सरकारी कंपनीचे शेअर्स 20 जानेवारी 2023 रोजी बीएसई निर्देशांकावर 766.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 240 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. जर तुम्ही 20 जानेवारी 2022 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.42 लाख रुपये झाले असते.

6 महिन्यांत 185 टक्के परतावा :
माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 26 जुलै 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 269.05 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 20 जानेवारी 2023 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 766.75 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज सोमवारी शेअरची किंमत 769.20 रुपये किमतीवर बंद झाली होती. या कंपनीचे बाजार भांडवल 15,465 कोटी रुपये आहे. माझगाव डॉक कंपनीच्या शेअरने सुरूवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 357 टक्के परतावा कमावून दिला आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने सप्टेंबर 2022 या तिमाहीमध्ये 200 कोटीं रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीमध्ये माझगाव डॉक कंपनीने 1702.36 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. माझगाव डॉक कंपनीमध्ये सरकारचा वाटा 15.17 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mazagon Dock Shipbuilders Share Price 543237 MAZDOCK stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Shipbuilders Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x