23 November 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Coforge Share Price | जायंट IT कंपनी शेअरवर डिव्हीडंड देणार, या बातमीने शेअरमध्ये उसळी, रेकॉर्ड डेट पाहा

Coforge Share Price

Coforge Share Price | ‘कोफोर्ज लिमिटेड’ या मिड-कॅप IT कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीमध्ये कंपनीने एकूण 345 दशलक्ष डॉलर्सचा व्यापार केला आहे. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये 235.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीमधे कंपनीने कमावलेल्या नफ्याच्या तुलनेत यावर्षी नफ्यात 19.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीमध्ये कंपनीने 197.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, जो यावर्षी 19.60 टक्के वाढून 235.90 कोटी रुपये झाला आहे. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी कोफोर्ज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.99 टक्के वाढीसह 4347.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Coforge Share Price | Coforge Stock Price | BSE 32541 | NSE COFORGE)

कंपनीची एकूण कमाई :
ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये कंपनीने 2056 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कोफोर्ज लिमिटेड कंपनीच्या महसुलात 24 टक्क्यांची टक्क्यांची वाढ होऊन महसूल 2055.8 कोटी रुपयेवर गेला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीमध्ये कंपनीने 1658.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 18.5 टक्के वर गेला आहे. तर डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात अमेरिका आणि युरोपमधून अधिक भर पडली आहे. या कंपनीच्या एकूण महसुल संकलनात अमेरिकन आणि युरोपीय बाजारांचा वाटा 80 टक्के पेक्षा अधिक आहे.

गुंतवणूकदारांना फायदा :
‘कोफोर्ज लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 19 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘कोफोर्ज लिमिटेड’ कंपनीने लाभांश वितरण करण्यासाठी 3 फेब्रुवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये 3 मोठे व्यापारी करार केले आहेत. कंपनीने ज्यात 50 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे क्लायंट आणि 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे दोन व्यापारी करार केले आहेत. डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये कंपनीच्या ग्राहक यादीत 11 नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. कोफोर्ज कंपनीने तिमाही निकालात माहिती दिली आहे की, पुढील 12 महिन्यांमध्ये जे करार पूर्ण करायचे आहेत, त्याचे एकूण मूल्य 841 दशलक्ष डॉलर्स आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Coforge Share Price 32541 stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

Coforge Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x