22 November 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा जबरदस्त शेअर, 1 लाखावर 68 लाख परतावा दिला, स्टॉक डिटेल्स

Tata Elxsi Share Price

Tata Elxsi Share Price | मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सनी टाटा उद्योग समूहाचा भाग आलेल्या या कंपनीच्या शेअरवर मोठी बाजी लावली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टाटा एलेक्सी’. टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर ने कोविड नंतरच्या रॅलीमध्ये आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 6678 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Elxsi Share Price | Tata Elxsi Stock Price | BSE 500408 | NSE TATAELXSI)

टाटा एलेक्सी स्टॉकमध्ये तेजीचे कारण :
मार्सेलस इन्व्हेस्टमेंट फर्मच्या सौरभ मुखर्जीनी टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. सौरभ मुखर्जी यांनी टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स केल्याची माहिती मार्सेलस इन्व्हेस्टमेंट फर्मने आपल्या अहवालात दिली आहे. टाटा एलेक्सी कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी संशोधन आणि विकास कंपनी म्हणून काम करते. ही कंपनी आपल्या उत्पादनांच्या जीवनचक्राच्या सुरुवातीच्या काळात ग्राहक जोडण्याचे काम करते.

टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचे आणखी एक कारण म्हणजे ही कंपनी आपल्या उत्तम सेवा प्रदान करून ग्राहक आकर्षित करते जेणेकरून ती आपल्या स्पर्धक कंपन्यांना मागे टाकू शकेल. विविध संशोधन आणि विकासामध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा फायदा म्हणजे कंपनीला पुढील काळात अधिक पेटंट मिळणे अपेक्षित आहे. टाटा एलेक्सी कंपनीचा मुख्य फोकस आपल्या ऑटोनॉमस ड्रायव्हिंग आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीमवर असल्याने तज्ञांनी या स्टॉकबाबत बुलिश भावना व्यक्त केल्या आहेत.

Marcellus च्या अहवालानुसार टाटा एलेक्सी कंपनी आपले कर्मचारी कायम टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. टाटा उद्योग समूहाच्या कंपनीने केरळसारख्या टियर-2 शहरांमध्ये कार्यालय सुरू करण्याची योजना आखली आहे. मारसेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर फर्मच्या माहितीनुसार टाटा एलेक्सी कंपनीचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी अजूनही कंपनीत दीर्घकाळापासून काम करत आहेत. मागील सहा महिन्यांत टाटा उद्योग समूहाच्या टाटा एलेक्सी कंपनीने तिरुअनंतपुरममध्ये नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. या कार्यालयात कंपनीने 2,500 अभियंते नियुक्त केले आहेत. टाटा एलेक्सी कंपनीने कोझिकोड येथेही एक नवीन कार्यालय सुरू केले असून त्यात 1000 अभियंते नियुक्त केले आहेत.

मार्सेलस इन्व्हेस्टमेंट फर्मच्या सौरभ मुखर्जीनी अनुभवी गुंतवणूकदाराने आपल्या पोर्टफोलिओमधून Relaxo Footwear कंपनीचे शेअर्स विकून टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. मार्सेलस फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे रिल्याक्सो फुटवेअर कंपनीला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या. या कंपनीने आपल्या मार्जिनचे संरक्षण करण्यासाठी उत्पादनाच्या किमती वाढल्या आणि त्यामुळे त्याच्या व्यवसायाच्या प्रमाणात मोठी घट पाहायला मिळाली. हा ट्रेंड मागील सहा ते नऊ महिन्यांपासून पाहायला मिळत असल्याने या तिमाहीत कंपनीच्या शेअरवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो असे तज्ञांचे मत आहे.

टाटा एलेक्सी शेअरचा इतिहास :
टाटा उद्योग समूहाचा स्टॉक मागील एका वर्षापासून बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाल्याने श्रेणीबद्ध ट्रेंडमधून स्टॉक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पोस्ट-कोविड रीबाउंडमध्ये सुमारे तीन वर्षांत या शेअरची किंमत 600 वरून वाढून 6425 रुपयेवर पोहचली आहे. मागील तीन वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 मार्च 2013 रोजी टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स 94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 6678 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 2013 पासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 6740.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 2013 साली या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 68 लाख रुपये झाले असते. या काळात तुम्हाला 18,246.14 टक्के परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Elxsi Share Price 500408 TATAELXSI stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x