22 November 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

नातू म्‍हणाला आजोबा मीच 'पार्थ' मीच लढणार, आजोबांना ताईंची काळजी, दादांना पोराची

BJP, Ashish Shelar, Sharad Pawar

मुंबई : मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके, आजोंबाच्‍या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके, अशा शब्दात भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची, असा सवाल करीत नव्या पिढीला संधी देण्याकरिता निवडणूक लढविणार नाही, असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी मावळ मतदारसंघातून माघार घेतली होती. तर शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन आजोबांना केले होते. एका नातवासाठी पवारांना माघार घ्यावी लागली असतानाच दुसऱ्या नातवाने विरोधात भूमिका घेतल्याने पवार कुटुंबातच सारे काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु झाली.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून एनसीपीवर जोरदार निशाणा साधला. आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणतात, एक नातू म्‍हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्‍हीच लढवा…दुसरा नातू म्‍हणाला आजोबा आजोबा मीच “पार्थ” मीच लढणार…आजोबांना होती ताईंची काळजी…दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोंबाच्‍या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके. त्यामुळे आता आशिष शेलार यांना राष्ट्रवादी काँग्रेस कसं प्रतिउत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x