Vedanta Share Price | या शेअरने कमी कालावधीत 50% परतावा, लवकरच डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड डेट पहा

Vedanta Share Price | ‘वेदांता लिमिटेड’ ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा वेदांता लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची तयारी करत आहे. कंपनीने 2022-2023 या चालू आर्थिक वर्षासाठी चौथा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 27 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये चौथ्या अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल, आणि प्रस्तावाला मान्यता दिली जाईल. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 326.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 440.75 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vedanta Share Price | Vedanta Stock Price | BSE 500295 | NSE VEDL)
लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख :
‘वेदांता लिमिटेड’ कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे. त्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 4 फेब्रुवारी 2020 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करतील. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये वेदांता लिमिटेड कंपनीकडून जाहीर करण्यात आलेला हा चौथा अंतरिम लाभांश असेल. वेदांत कंपनीने मे 2022 मध्ये प्रति शेअर 31.50 रुपये, जुलै 2022 मध्ये 19.50 रुपये, नोव्हेंबर 2022 मध्ये 17.50 प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप केलं होता.
सात महिन्यात दिला 50 टक्के परतावा :
मागील सात महिन्याच्या कालावधीत वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 53 टक्क्यांनी वाढली आहे. 1 जुलै 2022 रोजी बीएसई निर्देशांकावर वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 213.95 होती. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी वेदांता कंपनीचे शेअर 326.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. वेदांता कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 206.10 रुपये होती. वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,21,273 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vedanta Share Price 500295 VEDL stock market live on 27 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Sarkari Investment Plan | शेअर बाजार नको, रेग्युलर इन्कमसाठी 3 सरकारी योजना, महिना 9250 रुपयांपर्यंत कमाई होईल
-
No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआयवर किती खर्च येतो? गणित समजून घेतलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, मार्केट तज्ज्ञांनी दिले अपसाईड तेजीचे सकारात्मक संकेत - NSE: IREDA
-
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा
-
Homemade Ayurvedic Tea | अशाप्रकारे घरीच बनवून आयुर्वेदिक वसंत चहा प्या, खूप फायदेशीर घटक मिळतील, आजारांपासून सुटका
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर 46 रुपयांवर आला, 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, सध्याच्या शेअर्स BUY करावे की Hold - NSE: VEDL
-
IRFC Share Price | रेल्वे स्टॉक घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा अलर्ट, मोठ्या घसरणीचे संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू इरेडा कंपनी शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IREDA
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, संधी सोडू नका - NSE: VEDL