22 November 2024 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Mphasis Share Price | करोडपती बनवणारा शेअर! 49 हजारवर दिला 1 कोटी परतावा, डोळे झाकुन पैसे गुंतवावे असा स्टॉक, डिटेल्स पाहा

Mphasis Share Price

Mphasis Share Price | शेअर बाजारात चढ उताराचे चक्र नेहमी सुरूच असते. अनेक स्टॉक वरच्या किंवा खालच्या पातळीत ट्रेड करत असतात आणि यातून ट्रेडर्स पैसे कमावतात. काही असे स्टॉक असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देतात. बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांना अल्पशा गुंतवणुकीवरही लाखो-करोडो रुपयांचा फायदा होतो. असाच काहीसा चमत्कार आयटी सेवा प्रदान करणाऱ्या एका कंपनीने दाखवला आहे. या आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘मफ्सिस लिमिटेड ‘. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mphasis Share Price | Mphasis Stock Price | BSE 526299 | NSE MPHASIS)

मफ्सिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात करोडपती बनवले आहे. आयटी सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये 22 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 50000 गुंतवणूक करून संयम राखला, ते लोक आज करोडपती बनले आहेत. याकाळात मफ्सिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20411 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात स्टॉकमध्ये काही प्रमाणत पडझड झाली असूनही ही पडझड मागील 22 वर्षाच्या कामगिरी समोर किरकोळ आहे.

दीर्घ काळात अप्रतिम परतावा :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मफ्सिस लिमिटेड कंपनीचे शेअर 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 2110.55 रुपयांवर क्लोज झाले होते. दुसरीकडे, बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक तेजीत ट्रेड करत होता. त्याच वेळी, 22 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपये होती. या कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, दीर्घ मुदतीत मफ्सिस लिमिटेड कंपनीने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

मफ्सिस लिमिटेड कंपनीच्या शेअरची वाटचाल :
19 ऑक्टोबर 2001 रोजी मफ्सिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.29 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जी आता 20411 टक्क्यांच्या वाढीसह 2110.55 रुपयांवर पोहचली आहे. जर तुम्ही 2001 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 49,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटी रुपये झाले असते. मागील वर्षी मार्च 2022 या महिन्यात स्टॉक 3466.40 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पाळतीवर पोहचला होता. मात्र त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये स्टॉकमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1,897 रुपये होती. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 2,067.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरमध्ये तुफानी तेजी :
जर तुम्ही या कंपनीचा वार्षिक परतावा पाहिला तर तुम्हाला समजेल की या शेअरच्या किमतीत वर्षानुवर्ष कमालीची वाढ झाली आहे. 19 ऑक्टोबर 2001 रोजी या कंपनीचे शेअर 10.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 ऑक्टोबर 2002 रोजी शेअरची किंमत 69 रुपयेवर पोहोचली. 10 ऑक्टोबर 2003 मध्ये स्टॉकची किंमत 127 रुपयेवर पोहचली होती, ते 15 ऑक्टोबर 2004 मध्ये 140 रुपयांवर स्टॉक ट्रेड करत होता. तीन वर्षांनंतर म्हणजेच 5 ऑक्टोबर 2007 रोजी शेअरची किंमत 277 रुपयेवर पोहचली होती तर ऑक्टोबर 2010 मध्ये स्टॉक 631 रुपयेवर ट्रेड करत होता. 31 ऑगस्ट 2018 रोजी स्टॉकची किंमत 1260 रुपयेवर गेली होती. आणि 11 मार्च 2022 रोजी स्टॉक 3400 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 2,067.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ज्ञांचे स्टॉक बाबत मत : जर तुम्ही या कंपनीचे मागील एक वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, स्टॉकमध्ये 31 टक्क्यांची पडझड झाली आहे. मागील पाच वर्षांत स्टॉकची किंमत 147 टक्क्यांनी वाढली होती. तर मागील एका महिन्यात शेअरची किंमत 10 टक्क्यांनी मजबूत झाली होती. भारतीय ब्रोकरेज कंपन्यानी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. आणि तज्ञांनी 2450 रुपये नवीन लक्ष्य किंमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mphasis Share Price 526299 stock market live on 27 January 2023.

हॅशटॅग्स

#Mphasis Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x