27 November 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

IRB Infra Share Price | लॉटरी लागली! या शेअरने 498% परतावा दिला प्लस स्टॉक स्प्लिटने गुंतवणूकदार मालामाल, स्टॉक डिटेल्स पहा

IRB infra Share Price

IRB infra Share Price | राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते बनवणाऱ्या IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 498 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले होते की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय घेतला. या स्टॉक स्प्लिट प्रस्तावाला कंपनीचे शेअर्स धारक आणि स्टॉक मार्केट नियामक सेबीकडून मंजुरी मिळण्यास अवकाश आहे. तथापि बाजाराला कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेली स्टॉक स्प्लिट ऑफर आवडली नाही, परिणामस्वरूप शेअरची किंमत 7.84 टक्के घसरली असून शेअर 265.70 रुपये किमतीवर आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947)

28 फेब्रुवारीपर्यंत स्टॉक स्प्लिट :
IRB इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 1 रुपये दर्शनी मूल्यच्या 10 भागात विभाजित करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या एका शेअरचे 10 तुकडे करणार आहे. मात्र यासाठी कंपनीच्या शेअर धारकांची आणि सेबीची मंजुरी आवश्यक असते. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग संख्या वाढावी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करता यावे, यासाठी कंपनीने स्टॉक स्प्लिट योजना जाहीर केली आहे. ही स्टॉक स्प्लिट योजना 28 फेब्रुवारी 2023 पूर्ण होईल.

मल्टीबॅगर परतावा :
3 एप्रिल 2020 पर्यंत IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने शेअर्स 51.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 265.70 रुपयेवर पोहचली आहे. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत या स्टॉकने लोकांना 498 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील महिन्यात 14 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 329.30 रुपये या आपल्या उच्चांक परकी किमतीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी 20 जून 2022 मध्ये या शेअरची ट्रेडिंग किंमत 179.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price 532947 stock market live on 28 January 2023.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x