22 November 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

ITC Share Price | आयटीसी स्टॉक वाढतोय, नेमकं कारण काय? या स्टॉकने गुंतवणुकदारांना किती कमाई करून दिली

ITC share price

ITC Share Price | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव असताना आयटीसी कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. एकीकडे शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळत होती तर दुसरीकडे आयटीसी कंपनीचे शेअर 2 टक्क्यांच्या वाढीसह 348 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयटीसी कंपनीने 348 रुपये ही आपली 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. दिवसाच्या अखेरीस शेअरची किंमत 361.90 रुपये पर्यंत पोहोचली होती आणि शेअरने नवीन उच्चांक पातळी निर्माण केली. आज (मंगळवार ३१ जानेवारी २०२३) हा शेअर 2.19% वधारून 352 रुपयांवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)

जानेवारी 2023 च्या सुरुवातीला आयटीसी कंपनीकडून घोषणा करण्यात आली होती की आयटीसी कंपनी डी टू सी ब्रँड ‘योगा बार’ कंपनी विकत घेऊ शकते. योगाबार ही बेंगलोर स्थित एक हेल्थ फोकस स्नॅक्स कंपनी आहे. पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये स्प्राउट फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे 100 टक्के भाग भांडवल अधिग्रहण करण्याची योजना ITC कंपनीने आखली आहे. या अधिग्रहणाद्वारे कंपनी आपल्या हेल्दी फूड ब्रँड उत्पादनांचा पोर्टफोलिओ वाढवू इच्छित आहे. सध्या आयटीसी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आशीर्वाद मल्टी ग्रेन आटा, आशीर्वाद नेचर सुपर फूड्स, सनफिस्ट प्रोटीन शेक, यांचा समावेश होतो.

सप्टेंबर 2022 या तिमाहीत ITC कंपनीने 4466 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीच्या तुलनेत आयटीसी कंपनीच्या नफ्यात 21 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आयटीसी कंपनीच्या मुख्य व्यवसायात हॉटेल, सिगारेट आणि शेती व्यवसाय यांचा समावेश होतो. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल कंपनीने अद्याप जाहीर केले नाही. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत आयटीसी कंपनीच्या शेअरची किंमत चार टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITC Share Price 500875 stock market live on 31 January 2023.

हॅशटॅग्स

#ITC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x