Adani Groups Penny Stocks | अदानी बॉण्ड्सची जागतिक लायकी शून्य, अदानी ग्रुपचे शेअर्स पेनी स्टॉक होणार? नेमकं काय होणार?
Adani Groups Penny Stocks | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल आल्यापासून केवळ सात ट्रेडिंग दिवसांमध्ये अदानीच्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स सुमारे ५० टक्क्यांनी घसरले आहेत. आजही अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक परिणाम अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसवर दिसून येत आहे. अदानी एंटरप्रायजेसचे शेअर्स विक्रम मोडत आहेत. आज म्हणजे शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ३० टक्क्यांनी घसरून १,०९५.३० रुपयांवर आला. ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
शेअर्स तब्बल 83 टक्क्यांनी घसरले
गेल्या तीन दिवसात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये जवळपास ८३ टक्क्यांची घसरण झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमधील उच्चांकी पातळीवरून ३५ टक्क्यांनी घसरले होते. मात्र, नंतर थोडी सुधारणा झाली आणि शेअर २६ टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्यानंतर २ फेब्रुवारीरोजी अदानी एंटरप्रायजेसचा शेअर २७ टक्क्यांनी घसरला. आज 3 फेब्रुवारीला या शेअरमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास निम्म्याने घटून १,२४,८६४ कोटी रुपयांवर आले आहे. तर गेल्या २४ तासांत अदानी समूहातील सर्व लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप १०८ अब्ज डॉलरने घटले आहे.
कंपनीवर एकापाठोपाठ एक संकटे
अदानी एंटरप्रायजेसचा २० हजार कोटीरुपयांचा एफपीओ येत होता. म्हणजेच कंपनी बाजारात नवे शेअर्स जारी करून २०,००० कोटी रुपये उभारणार होती. पण हिंडेनबर्गच्या अहवालानंतर शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीसह सर्व वादांमुळे कंपनीने १ फेब्रुवारीच्या रात्री अचानक एफपीओ रद्द करण्याची घोषणा केली. दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) अदानी एंटरप्रायझेससह समूहाचे आणखी दोन शेअर्स एएसएम यादीत टाकले.
याचा अर्थ असा की स्टॉक आता अधिक कठोर नियमांच्या अधीन आहेत आणि तारण ठेवता येत नाहीत. इतकंच नाही तर आता शेअर्सना अमेरिकन बाजारातून बाहेरचा मार्गही दाखवला जाऊ शकतो. अदानी एंटरप्रायझेसचा हा शेअर डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Adani Groups Penny Stocks directions check details on 03 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News