31 January 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773
x

Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का?

Sterling Tools Share Price

Sterling Tools Share Price | ‘स्टर्लिंग टूल्स’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई निर्देशांकावर 2.20 टक्के घसरणीसह 364.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. बरेच दिवस कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत होते, मात्र आज स्टॉकमध्ये किंचित पडझड पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे स्टर्लिंग टूल्स कंपनीचे शेअर्स बाजारात अस्थिरता असताना हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sterling Tools Share Price | Sterling Tools Stock Price | BSE 530759 | NSE STERTOOLS)

एक लाखावर तीन लाख परतावा :
‘स्टर्लिंग टूल्स’ कंपनीच्या शेअरने मागील एक महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचवेळी मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपला गुंतवणूकदारांना 41 टक्के आणि गेल्या एक वर्षात 104 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील नऊ महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 203 टक्के वाढवले आहे. 2 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 123 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शेअरची किंमत 364.95 रुपयांवर क्लोज झाली आहे. नऊ महिन्यांपूर्वी जे तुम्ही या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3 लाख रुपये झाले असते.

‘स्टलिंग टूल्स’ ही भारतातील दुसरी सर्वात मोठी ‘ऑटोमोटिव्ह फास्टनर’ कंपनी मानली जाते. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या कंपन्यांना ‘मोटार कंट्रोल युनिट’ पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. MCU हा EV वाहनातील एक महत्त्वाचा पार्ट असतो. त्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मोटर कंट्रोल अल्गोरिदम आणि फर्मवेअर कौशल्याचे संयोजन असणे आवश्यक आहे. हा कंपनीने 2020 मध्ये इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात व्यापार सुरू केला आणि ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या ई-टू-व्हीलर MCU पुरवठादारांमध्ये अग्रणी बनली आहे.

कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल :
चालु आर्थिक वर्ष 2022-23 मधील तिसऱ्या तिमाहीत या कंपनीने 13.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 5.5 कोटी रुपये होता. कंपनीचा PAT आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तीन तिमाहीमध्ये 40.1 कोटी रुपये होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 18.7 कोटी रुपये होता. कंपनीच्या वार्षिक महसुलात 64.7 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 560.3 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterling Tools Share Price 530759 STERTOOLS stock market live on 03 February 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x