23 December 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा
x

Comfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी

Comfort Fincap Share Price

Comfort Fincap Share Price | ‘कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड’ वित्त सेवा प्रदान करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने शेअर विभाजन करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आणि सोबत कंपनीने 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 98.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल 106.72 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Comfort Fincap Share Price | Comfort Fincap Stock Price | BSE 535267)

कंपनीची घोषणा :
‘कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1 : 5 या प्रमाणात शेअर विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. शेअर विभाजनाबाबत कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीच्या शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स अधिक स्वस्तात घेता यावे यासाठी स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
‘कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड’ कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत 3.64 कोटी रुपये निव्वळ विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 3.18 कोटी रुपये होता. एका वर्षात कंपनीच्या सेल्समध्ये 14.46 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीने डिसेंबर 2022 या तिमाहीत 1.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 1.33 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत या कंपनीचा एकत्रित EPS 1.19 रुपये नोंदवण्यात आला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 1.23 रुपये होता.

गुंतवणुकीवर मल्टीबॅगर परतावा :
शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर ‘कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 98.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 98.70 रुपये या मागील कलोजिग किमतीच्या तुलनेत शेअर काल 0.35 टक्के खाली आला होता. मागील 5 वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 526 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1773 टक्के परतावा कमावून दिला आहे.

‘कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड’ या स्टॉकने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 194.78 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारावर शेअरची किंमत 10.44 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 91.16 टक्के आणि मागील एका महिन्यात शेअरची किंमत 8.73 टक्के अधिक वाढली आहे. 13/01/2023 रोजी ‘कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 108.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. तर 29/03/2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. सध्या हा स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 365.01 टक्के वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Comfort Fincap Share Price 535267 stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

Comfort Fincap Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x