23 December 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | अबब! 2 वर्षात 1 लाखांवर दिला 67 लाख परतावा, सलग 9 दिवस अप्पर सर्किट, कमाईदार स्टॉकची डिटेल्स

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात मागील बऱ्याच काळापासून अस्थिरता आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स निर्देशांक 2.22 टक्क्यांनी खाली आला आहे, एका वर्षात सेन्सेक्समध्ये फक्त 1.95 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात गोंधळ असूनही असे काही शेअर्स आहेत ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. यापैकीच एक स्टॉक आहे, ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स’. या कंपनीच्या शेअरने मागील.अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1 लाखावर 67 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स’ ही कंपनी शेतकऱ्यांना विविध पिकांचे उच्च दर्जाचे बियाणे पुरवते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bombay Super Hybrid Seeds Share Price | Bombay Super Hybrid Seeds Stock Price | NSE BSHSL)

‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 4.99 टक्के वाढीसह 634.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ही या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी आहे. सलग 9 दिवसापासून शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे म्हणून शेअरची किंमत उच्चांक किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत शेअर्सची किंमत 47.68 टक्क्यांनी वधारली आहे.

मागील 2 वर्षात ‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6,684 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी शेअरची किंमत फक्त 8.90 रुपये होती, जी आता वाढून 634 रुपयेवर पोहचली आहे. मागील अडीच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 6,684.83 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

1 लाखावर दिला 67 लाख परतावा :
जर तुम्ही 30 ऑक्टोबर 2020 रोजी ‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6684.83 टक्के वाढून 67 लाख रुपये झाले असते. अशा शेअर मध्ये पैसे लावून अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपये कमाई केली आहे.

कंपनीची कामगिरी :
‘बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स’ कंपनीच्या शेअर्सचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्या समजेल की, मागील एका वर्षात ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,694.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 145.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Bombay Super Hybrid Seeds Share Price BSHSL stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x