IRCTC Railway Service | रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केली नवी सेवा, प्रवासावेळी जागेवर ऑनलाईन मिळेल मदत

IRCTC Railway Service | भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन सेवा सुरू करत आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेने खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. प्रवाशांना ऑनलाइन जेवण देण्याची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता रेल्वेने प्रवाशांना व्हॉट्सॲपद्वारे जेवण मागवण्याचा पर्याय दिला आहे. जर तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचून तुम्ही स्वत:साठी जेवणही मागवू शकता.
व्हॉट्सॲपवरून ऑर्डर करू शकता जेवण
ई-कॅटरिंग सेवा ग्राहककेंद्री करण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम हाती घेतला आहे. जेवण मागवण्यासाठी रेल्वेकडून एक व्हॉट्सॲप नंबरही जारी करण्यात आला आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे ग्राहकांना ई-कॅटरिंग सेवा पुरवते. ई-कॅटरिंग सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना जेवण मागवण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिकेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी बिझनेस व्हॉट्सॲप नंबर +91-8750001323 जारी करण्यात आला आहे.
ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही
सुरुवातीला रेल्वेने व्हॉट्सॲप कम्युनिकेशनद्वारे ई-कॅटरिंग सेवा देण्यासाठी दोन टप्प्यांची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात ई-कॅटरिंग सेवेच्या निवडीसाठी ई-तिकीट बुक केलेल्या ग्राहकाला www.ecatering.irctc.co.in व्हॉट्सॲप नंबर लिंकवर क्लिक करून मेसेज पाठवला जाईल. आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंग वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांना स्थानकांवर उपलब्ध असलेल्या रेस्टॉरंटमधून जेवण बुक करता येणार आहे. व्हॉट्सॲपवरून जेवण मागवण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही.
व्हॉट्सॲप कम्युनिकेशन सेवेच्या दुसऱ्या टप्प्यात व्हॉट्सॲप नंबर ग्राहकांसाठी टू-वे कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बनू शकणार आहे. यामध्ये एआय पॉवर चॅटबॉट प्रवाशांच्या ई-कॅटरिंग सेवेशी संबंधित सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि प्रवाशांसाठी जेवणबुकही करेल. सध्या निवडक गाड्यांमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिकेशन सिस्टीम लागू करण्यात आली आहे. त्यानंतर ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे इतर गाड्यांमध्येही व्हॉट्सॲप कम्युनिकेशन सिस्टीम लागू करण्यात येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: IRCTC Railway Service launch whatsapp based food delivery system check details on 07 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON