5 November 2024 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! 1 लाखावर दिला 5.75 कोटी परतावा, हा स्टॉक आजही खरेदीला फेव्हरेट का?

Titan Company Share Price

Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीच्या शेअरने 1 जानेवारी 1999 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 57424 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या स्टॉक बाबत उत्साही आहेत, आणि त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात टायटन कंपनीचे शेअर्स मजबूत नफा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने टायटन कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स 2800 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के वाढीसह 2,470.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)

एक लाखावर दिला 5.75 कोटी परतावा :
टायटन कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, 1 जानेवारी 1999 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 4.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2,470.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत टायटन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57424.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 जानेवारी 1999 रोजी टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.75 कोटी रुपये झाले असते.

टायटन शेअर किंमत इतिहास :
जर आपण टायटन कंपनीचे मागील 5 दिवसांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, टायटन कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसात आपल्या शेअर धारकांना 4.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात टायटन कंपनीच्या गुंतवणूकदारांना 1.14 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. मागील सहा महिन्यांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना काही खास फायदा मिळवून दिला नाहीये. या कालावधीत शेअरची किंमत केवळ 0.38 टक्के वाढली होती. 2023 या नवीन वर्षात टायटन कंपनीचे शेअर्स साडेचार टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 208 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. टायटन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2791 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 1825.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price 500114 stock market live on 08 February 2023.

हॅशटॅग्स

Titan Company Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x