5 November 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Gold Price Today | आज सोनं कोणत्या नव्या दरांवर कोसळलं? सोनं खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील नवे दर पहा

Gold Price Today

Gold Price Today | दिल्लीसराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,275 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 57,147 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भाव मात्र 38 रुपयांनी घसरून 67,975 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, दिल्लीत सोन्याचा स्पॉट भाव 128 रुपयांनी वाढून 57,275 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,874 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 22.42 डॉलर प्रति औंस होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या कमोडिटी रिसर्च विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांचे लक्ष या आठवड्यात आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे असेल.

सोन्याचा दर प्रथम ५७,७०० पर्यंत जाण्याची शक्यता
कमॉडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन फेडरल आणि बहुतेक युरोपियन मध्यवर्ती बँकांनी व्याजदरवाढीबाबत किंचित नरम भूमिका घेतल्याने डॉलरची मागणी वाढली, ज्यामुळे अमेरिकन डॉलरचे दर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून वाढले. या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींना 1,860 डॉलरच्या पातळीवर भक्कम आधार मिळाला आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ५६,५०० च्या पातळीवर भक्कम आधार राखत असून येथून तो ५७,७०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

22 ते 24 कॅरेट मधील फरक
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने सुमारे 91% शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त असे ९ टक्के इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने उत्तम असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतांश दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 08 February 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x