19 April 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

Vaxtex Cotfab Share Price| या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स तेजीत आले, 6 रुपयेचा शेअर इतका का वाढतोय? वाचा स्टॉक वाढीचे सविस्तर कारण

Vaxtex Cotfab Share Price

Vaxtex Cotfab Share Price | शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात काही पेनी स्टॉकमध्ये मजबूत तुफानी तेजीचे दर्शन झाले आहे. असाच एक पेनी स्टॉक तेजीत ट्रेड करत आहे, त्याचे नाव ‘वॅक्सटेक्स कॉटफॅब लिमिटेड’ असे आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते, तर बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी ‘वॅक्सटेक्स कॉटफॅब लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 16.07 टक्के वाढीसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तथापि मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 75 टक्के खाली आले आहेत. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने आपले शेअर्स विभाजन करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vaxtex Cotfab Share Price | Vaxtex Cotfab Stock Price | BSE 533096 | NSE VCL)

शेअर विभाजनाची रेकॉर्ड तारीख :
‘वॅक्सटेक्स कॉटफॅब’ कंपनीने आपले शेअर विभाजन करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. अलीकडेच कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, कंपनीने आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाणात स्प्लिट करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याचा अर्थ कंपनीचे शेअर्स 2 तुकड्यांमध्ये विभागले जाईल. कंपन्या किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना शेअरची तरलता वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिट करतात. यामुळे गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये कोणताही बदल होत नाही.

वॅक्सटेक्स कॉटफॅब कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील दिवसाच्या बंदच्या तुलनेत शेअरची किंमत 13.13 टक्के वाढली होती. तर आज बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी ‘वॅक्सटेक्स कॉटफॅब लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 16.07 टक्के वाढीसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एक वर्षात या कंपनीचे शेअर्स 75 टक्के कमजोर झाले आहेत. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 37.35 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 4.55 रुपये होती. सध्या अरॉक वसुलीच्या ट्रॅकवर ट्रेड करताना दिसत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 2,810.97 लाख रुपये आहे.

वॅक्सटेक्स कॉटफॅब लिमिटेड कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. कंपनी शर्टिंग, सूटिंग आणि अॅक्सेसरीजसाठी रॉ फॅब्रिकवर रंग आणि फिनिशिंग करण्याचे काम करते. कंपनी कापड कंपन्यांच्या आउटसोर्सिंगमध्ये देखील गुंतलेली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत जाहीर केलेल्या आर्थिक निकालात कंपनीने नफा नोंदवला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत कंपनीने 366.67 टक्के अधिक नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vaxtex Cotfab Share Price 533096 VCL stock market live on 08 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Vaxtex Cotfab Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या