22 November 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Post Office Schemes Interest | पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी सर्वाधिक व्याज कोणत्या योजनेत? कुठे पैसा अधिक? डिटेल वाचा

Post Office Schemes Interest

Post Office Schemes Interest | पोस्ट ऑफिस हे हमी परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक असलेले गुंतवणुकीचे पारंपरिक साधन मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अल्पवयीनांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा पोस्ट ऑफीसच्या गुंतवणुकीवर गाढ विश्वास आहे. आजकाल पोस्ट ऑफिस योजनांमध्ये चांगला व्याज परतावा मिळत आहे. भारत सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात ‘मासिक उत्पन्न बचत योजना’ चे काही नियम बदलले आहेत. काही योजनांवरील व्याजदरात वाढ देखील करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला कोणत्या योजनेवर किती व्याज मिळत आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर, हा पूर्ण लेख वाचा.

1 ) पोस्ट ऑफिस बचत खाते :
तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ‘पोस्ट ऑफिस बचत खाते’ उघडून त्यात पैसे जमा करू शकता. खात्यात ठेवलेल्या ठेवींवर तुम्हाला काही प्रमाणात व्याज परतावा मिळेल. ज्यांना ठराविक दराने व्याज पाहिजे असेल त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस बचत खाते उघडण्यासाठी फक्त 20 जमा करावे लागतात.
* गुंतवणुकीवर वार्षिक व्याज : 4.00 टक्के
* खाते उघडण्याचे किमान शिल्लक : 20 रुपये

2) पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते :
‘पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट’ अकाउंटमध्ये ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करता येतात. आरडीमध्ये तुम्ही पाच वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. त्यावर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळेल, हो दर तिमाही आधारावर तुमच्या खात्यात जमा केला जाईल. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये तुझी 60 हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता. ज्यांना दरमहा थोडी रक्कम बचत करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे. आरडी कॅल्क्युलेटरद्वारे गुंतवणूकदार व्याज परतावा दर पाहू शकतात.
* वार्षिक व्याज दर : 5.80 टक्के
* किमान शिल्लक : 100 रुपये

3) पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते :
‘पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते’ ही पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजनांपैकी एक मानली जाते. या योजनेवर दिले जाणारे व्याज दर वित्त मंत्रालय द्वारे ठरवले जाते. तुम्ही या योजनेत एकल खाते, संयुक्त खाते किंवा अल्पवयीन मुलांसाठी गुंतवणूक खाते उघडू शकता. भारत सरकारने 1 जानेवारी 2023 रोजी ‘पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम’ च्या व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे.
* वार्षिक व्याज : 7.00 टक्के
* किमान शिल्लक : 1000 रुपये

4) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना :
‘पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना’ अल्प गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारा उत्पन्नाचा एक उत्तम स्रोत मानली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला व्याज परतावा मिळतो. या योजनेत सरकार दर तिमाही आधारावर व्याजाचे पुनर्विलोकन करते. POMIS योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. स्कीम मॅच्युरिटी झाल्यावर, गुंतवणूकदाराला संपूर्ण रक्कम काढण्याचा किंवा तितकीच रक्कम पुन्हा गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये, भारत सरकारने एकल व्यक्तींसाठी ठेव मर्यादा 9 लाख रुपये केली असून संयुक्त खात्याची गुंतवणूक मर्यादा 15 लाख रुपये केली आहे.
* वार्षिक व्याज : 7.10 टक्के
* किमान शिल्लक : रु. 1000/-

5) ज्येष्ठ नागरिक बचत योजना :
ज्येष्ठ नागरिकांना बचत करून चांगले उत्पन्न मिळवता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही भारत सरकारची हमी योजना आपल्या ठेवीदारांना नियमित उत्पन्नासह सुरक्षित गुंतवणुकीची हमी देखील देते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनामध्ये गुंतवणूक केल्यास व्याज स्वरूपात नियमित उत्पन्न मिळते. प्रत्येक तिमाहीत भारत सरकार व्याजाचे पुनर्विलोकन करते. व्याजाचे पुनरावलोकन केवळ तिमाही आधारावर केले जाते.
* वार्षिक व्याज : 8.00 टक्के
* किमान शिल्लक : रु. 1000/-

6. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना 1968 साली राष्ट्रीय बचत संस्थेने सुरू केली होती. या योजनेतील गुंतवणूक आणि व्याजावर भारत सरकारतर्फे सुरक्षेची हमी दिली जाते. अर्थ मंत्रालय दर तिमाहीनंतर व्याजाचे पुनर्विलोकन करते. मात्र या योजनेवर मिळणारे व्याज दरवर्षी 31 मार्च नंतरच दिले जाते. व्याजाची गणना दरमहा आधारावर केली जाते. महिन्याच्या 5 ते 30 तारखेदरम्यानच्या खात्यात किमान शिल्लक रकमेवर व्याज परतावा दिला जातो.
* वार्षिक व्याज : 7.10% p.a.
* किमान शिल्लक: रु. 500/-

7) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ ही एक अल्प बचत योजना असून अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटांना बचत करण्याची सुविधा प्रदान करते. भारत सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास हमखास परतावा दिला जातो. या योजनेवर मिळणारा व्याज परतावा प्रत्येक तिमाही आधारे ठरवले जातात. या अल्प उत्पन्न बचत योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षे निश्चित करण्यात आला आहे.
* व्याज: 7% p.a.
* किमान शिल्लक: रु. 1000/-

8) किसान विकास पत्र :
कोणीही भारतीय नागरिक किसान विकास पत्र खरेदी करू शकतो. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुमचे पैसे अवघ्या 123 महिन्यांत दुप्पट होतात. ही योजना व्याज स्वरूपात हमी उत्पन्न कमावून देते, आणि गुंतवणुकीवर व्याज दर प्रत्येक तिमाही आधारे निश्चित ठरवले जातात.
* व्याज: 7.20% p.a.
* किमान शिल्लक: रु.1000/-

9) सुकन्या समृद्धी खाती :
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत भारत सरकारने ‘सुकन्या समृद्धी योजना’ लहान मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केली होती. ही पोस्ट ऑफिस बचत योजना, मोदी सरकारने 2015 मध्ये मुलींचे शिक्षण आणि विवाह यासाठी होणारा खर्च पालकांना बोझा वाटू नये, या हेतूने सुरू केली होती. ही योजना हमखास परतावा मिळवून देते. योजनेवरील व्याजाचे पुनर्विलोकन तिमाही आधारावर केले जाते. गुंतवणूकदार आपल्या मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकतात, आणि त्यावर वार्षिक 7.60 टक्के व्याज परतावा मिळतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Schemes Interest rates on 08 February 2023.

हॅशटॅग्स

Post Office Schemes Interest(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x