23 November 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bharat Petroleum Corporation Share Price | या सरकारी शेअरच्या गुंतवणूकदारांची लॉटरी लागली, फ्री बोनस शेअर्सने केलं करोडपती

Bharat Petroleum Corporation Share Price

Bharat Petroleum Corporation Share Price | शेअर बाजार हा पूर्ण संयमाचा गेम आहे. जे लोक मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपनीमध्ये दीर्घ काळासाठी पैसे लावतात, त्यांना हमखास फायदा होतो. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास लोकांना वाढत्या किमतीचा तर फायदा होतोच, सोबत त्यांना बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट, राइट्स इश्यू, असे अनेक फायदे मिळत असतात. हे फायदे गुंतवणूकदाराच्या पैशात अनेक पट वाढ करतात. दीर्घकालीन गुंतवणूकीचा फायदा कसा होतो, जे जाणून घ्यायचे असेल तर, ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच ‘BPCL’ कंपनीच्या शेअर्सचा इतिहास तपासावा. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Petroleum Corporation Share Price | Bharat Petroleum Corporation Stock Price | BSE 500547 | NSE BPCL)

‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ या नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे नशीब चमकले आहेत. मागील 23 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल बनवले आहे. या शेअरमध्ये ज्या लोकांनी एक लाख रुपये लावले होते, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या नवरत्न कंपनीने 2000 सालापासून शेअर धारकांना चार वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना नियमित लाभांश देखील वाटप करत आहे. जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2 कोटींहून अधिक झाले असते.

BPCL च्या बोनस शेअर्सचे फायदे :
BSE वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 2000, 2012, 2016 आणि 2017 मध्ये आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. 20 डिसेंबर 2000 रोजी कंपनीने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर 13 जुलै 2012 आणि 13 जुलै 2016 रोजी कंपनीने गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. पुन्हा 13 जुलै 2017 रोजी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने लोकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.

बोनस शेअर्सचा परिणाम :
सुरुवातीला तीन 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केल्याने बीपीसीएलच्या दीर्घकालीन गुंतवणूकदाराची शेअरहोल्डिंग 8 पट वाढली. त्यानंतर 2017 मध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 1:2 बोनस शेअर्स वाटप केले. त्यानुसार गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 50 टक्क्यांनी वाढली. कारण कंपनीने दोन शेअर्सवर एक बोनस शेअर दिले होते. त्यामुळे, गुंतवणूकदाराचे शेअरहोल्डिंग एकूण 12 पट वाढली.

BPCL शेअर किंमत इतिहास :
2000 साली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी बीपीसीएल कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 333.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही बीपीसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 5,000 शेअर्स मिळाले असते. चार वेळा मिलेल्ल्या बोनस शेअरची बेरीज केली तर 5,000 शेअर्स संख्या 12 पट वाढली असती. याचा अर्थ 2000, 2012, 2016 आणि 2017 मध्ये बोनस शेअर्स जारी केल्यानंतर, तुमच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड शेअर्सची ची एकूण संख्या 60,000 झाली असती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Petroleum Corporation Share Price 500547 stock market live on 10 February 2023.

हॅशटॅग्स

BPCL share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x