22 November 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Paytm Share Price | अलीबाबा ग्रुप पेटीएममधून शेअर्स विकून बाहेर, पेटीएम स्टॉकचे पुढे काय होणार? तज्ज्ञ काय सांगतात?

Paytm share Price

Paytm Share Price | चीनमधील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ‘अलीबाबा’ ने पेटीएम कंपनीमधील आपले सर्व भाग भांडवल विकले आहेत. अलीबाबा ग्रुप पेटीएममधील सर्वात मोठ्या आणि सर्वात आधी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपैकी एक होता. त्याने आपली गुंतवणूक काढून घेण्यासाठी बरीच वर्षे वाट पाहिली. एका अहवालानुसार चीनच्या अलीबाबा ग्रुपकडे पेटीएम कंपनीचे 3.4 टक्के भाग भांडवल होते. आता अलीबाबा ग्रुपने आपल्या सर्व शेअर्स विकले आहेत. अलीबाबा ग्रुपने ब्लॉक डीलमध्ये पेटीएम कंपनीमधील 3.4 टक्के भाग भांडवल ओपन मार्केटमध्ये विकण्याचा निर्णय घेतला आहे. अलीबाबा ग्रुप पेटीएम कंपनीचे 2.1 कोटी शेअर्स ओपन मार्केटमध्ये विकून बाहेर पडेल. ही बातमी समोर आल्यानंतर, पेटीएम कंपनीच्या स्टॉकमध्ये 9 टक्के पडझड झाली होती, आणि शेअर 646 रुपये किमतीवर आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीच्या स्टॉकशी संबंधित चांगली बातमी आली, ज्याला स्टॉकने चांगला प्रतिसाद दिला होता. पेटीएम कंपनीची मूळ कंपनी ‘one97 कम्युनिकेशन’चे शेअर्स बुधवारी ही सलग तिसऱ्या दिवशी तेजीत व्यापार करत होते. त्या दिवशी पेटीएम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 30 रुपयेने वाढून 618 रुपये किमतीवर आले आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने आपल्या संशोधन अहवालात म्हटले की, पेटीएम कंपनीचे शेअर्स पुढील काळात 800 रुपये पर्यंत वाढू शकतात.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर पेटीएमच्या शेअर स्पर्श केलेली उच्चांक पातळी किंमत 1961 रुपये होती. सध्या पेटीएम कंपनीचा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 67 टक्के खाली ट्रेड करत आहे. पेटीएम कंपनीचा शेअर आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 70 टक्के खाली ट्रेड करत आहे. आजपर्यंत पेटीएम कंपनीचे शेअर्स आपली इश्यू किंमत स्पर्श करू शकले नाही.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अलीबाबा स्टॉक विकणार असल्याची बातमी समोर येताच पेटीएम कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आले. मागील 5 दिवसांत पेटीएम कंपनीचा स्टॉक 546 रुपये वरून 654 रुपयेवर गेला आहे. मागील 1 महिन्यात पेटीएम कंपनीचे शेअर्स 575 रुपये वरून 654 रुपये पर्यंत वाढले आहेत. ‘PayTm’ कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 825 रुपये वरून घसरून 654 रुपयेवर आले होते. 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 441 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 stock market live today as on 11 February 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x