23 November 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

SBI Mutual Fund | श्रीमंत व्हायचंय? SBI म्युचुअल फंडच्या या योजना 9 पट परतावा देतं आहेत, 5 हजार SIP वर 22.5 लाख परतावा

SBI Mutual Fund Scheme

SBI Mutual Fund | गुंतवणूक बाजारात अनेक म्युचुअल फंड योजना आहेत. यामध्ये एक ‘एसबीआय म्युच्युअल फंड’ देखील आहे. एसबीआय म्युच्युअल फंड विविध श्रेणीतील गुंतवणूकदारांना वय, जोखीम प्रोफाइल आणि आवश्यकता या प्रमाणे विविध योजना ऑफर करतात. एसबीआय म्युचुअल फंड हा भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंडांपैकी एक असून तो 20 वर्षापासून कार्यरत आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या योजनानी मागील 10 वर्षांत आपल्या एकरकमी गुंतवणूकदारांना 9 पट परतावा कमावून दिला आहे. दरम्यान एसआयपी गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली आहे. आज या लेखात आपण 10 वर्षांच्या कामगिरीवर आधारित सर्वोत्तम 5 योजनांची माहिती पाहणार आहोत. (SBI Mutual Fund Scheme, SBI Mutual Fund SIP – Direct Plan | SBI Fund latest NAV today | SBI Mutual Fund latest NAV and ratings)

एसबीआय स्मॉल कॅप फंड :
एसबीआय स्मॉल कॅप फंड या योजनेने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के CAGR परतावा मिळवून दिला आहे. तर 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 10 वर्षात 9 लाख रुपये परतावा दिला आहे. ज्यांनी या काळात 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 22.5 लाख रुपये झाले आहेत. या म्युचुअल फंड योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणुक करता येते, तर आणि किमान 500 रुपये जमा कडून SIP गुंतवणूक करता येते. 31 जानेवारी 2022 रोजी या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 11,288 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर 31 डिसेंबर 2021 रोजी म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.73 टक्के होते.

एसबीआय टेक अपॉर्च्युनिटीज फंड :
SBI Tech Opportunities Fund या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 10 वर्षात 20 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 10 वर्षात 1 लाख एकरकमी गुंतवणूकीवर 6.35 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी या योजनेत 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांना आया 20 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणुक करता येते तर किमान 500 रुपयांची एसबीआय गुंतवणूक करता येते. 31 जानेवारी 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 2,313 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती, तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 2.23 टक्के होते.

एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड :
एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंडाने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडांमध्ये 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 10 वर्षात 6.16 लाख रुपये परतावा मिळाला आहे. दुसरीकडे, ज्या लोकांनी या काळात 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना आता 16.5 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणुक करता येते. आणि किमान 500 रुपयांची SIP गुंतवणूक करता येते. 31 जानेवारी 2022 रोजी या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,859 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर 31 डिसेंबर 2021 रोजी त्याचे खर्चाचे प्रमाण 1.94 टक्के होते.

एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. यात 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 10 वर्षात 5.28 लाख रुपये परतावा मिळाला आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी या काळात 5000 रुपये मासिक एसआयपी केली होती, त्यांना आता 15.5 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या योजनेत, किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणुक करता येते, तर किमान 500 रुपयांची SIP गुंतवणूक करता येते. 31 जानेवारी 2022 रोजी या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 23,186 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर 31 डिसेंबर 2021 रोजी त्याचे खर्चाचे प्रमाण 1.92 टक्के होते.

SBI Consumption Opportunities Fund :
या म्युच्युअल फंडाने मागील 10 वर्षात लोकांना 17.87 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या योजनेत 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 10 वर्षात 5.18 लाख रुपये परतावा मिळाला आहे. तर दुसरीकडे ज्या लोकांनी 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना आता 14 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंड योजनेत, किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणुक करता येते. आणि किमान 500 रुपयांची SIP गुंतवणूक करता येते. 31 जानेवारी 2022 रोजी या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 892 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर 31 डिसेंबर 2021 रोजी खर्चाचे प्रमाण 2.44 टक्के होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Fund Scheme for huge return on 13 February 2023.

हॅशटॅग्स

SBI Mutual Fund scheme(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x