5 November 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव खाली कोसळले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आता त्यात घसरण दिसून येत आहे. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढत आहेत. सोनं 57,000 रुपयांवर आणि चांदी 67,000 रुपयांच्या खाली पोहोचली आहे. पण ही घसरण काही काळासाठी आहे, येत्या दिवाळीपर्यंत सोने 65000 रुपये आणि चांदी 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कालपासून सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 57025 रुपयांवर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी तो 57060 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३५ रुपयांनी घसरला आहे. मात्र, त्यानंतरही सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे 1857 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता. तर चांदीचा भाव आज 66387 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 66371 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे चांदीचा भाव आज प्रतिकिलो 16 रुपयांनी वधारला आहे.

सोन्याच्या किमतीवर 3 टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेस स्वतंत्रपणे भरावे लागतात. जर तुम्ही आज सोनं खरेदी करत असाल तर तुम्हाला जीएसटी आणि मेकिंग चार्जेस 57025 रुपयांच्या किंमतीपेक्षा वेगळे भरावे लागतील. मंगळवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 56797 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 52235 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 42769 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

आज सकाळी प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 52430 रुपये, 24 कॅरेट सोने : 57190 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५२४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१९० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 52400 रुपये, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५२४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१९० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 14 February 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x